गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

सेंट्रल व्हिस्टा मार्गाचा भूमिपूजन समारंभ

Posted On: 04 FEB 2021 4:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2021


सेंट्रल व्हिस्टा मार्गाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय गृह व शहरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील इंडिया गेट येथे आज संपन्न झाला. गृह व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे महासंचालक आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्याद्वारे, सेंट्रल व्हिस्टा मार्गाच्या विकासाचे / पुनर्विकासाचे काम सुरू झाले आहे. उत्तर व दक्षिण ब्लॉकपासून इंडिया गेट पर्यंत असलेल्या 3 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर राजपथ, त्यालगतची हिरवळ आणि कालवे, वृक्षराजी, विजय चौक आणि इंडिया गेट प्लाझा यांचा अंतर्भाव आहे. मुळात ब्रिटीश राजवटीच्या काळात व्हॉइसरॉयच्या घराकडे जाणारा एक भव्य शोभायात्रा मार्ग म्हणून याची रचना झाली होती. स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय लोक आणि त्यांच्या सरकारने त्याचा विनियोग केला होता.

      

 

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.


* * *

S.Tupe/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695147) Visitor Counter : 160