आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतातील दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या 8 महिन्यांनंतर 9,000 पेक्षा खाली घसरली, गेल्या 24 तासांत 8,635 नवीन रुग्णांची नोंद
दैनंदिन मृत्यू 100 पेक्षा कमी, 8.5 महिन्यांतले सर्वात कमी मृत्यू
39.5 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना कोविड-19 प्रतिबंधक लस देण्यात आली
Posted On:
02 FEB 2021 1:20PM by PIB Mumbai
भारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सातत्याने घसरण सुरूच आहे.
10 सप्टेंबर 2020 रोजी 95,735 च्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर आज ही संख्या 8,635 पर्यंत कमी झाली आहे, जी गेल्या 8 महिन्यांतील सर्वात कमी संख्या आहे.
भारतातील सरासरी दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत मागील 5 आठवड्यांत घसरण दिसून आली. 30 जानेवारी 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत ही सरासरी 18,934 होती, मात्र 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सरासरी दैनंदिन नवीन रुग्णसंख्या 12,772 पर्यंत कमी झाली आहे.
दुसर्या महत्त्वपूर्ण घडामोडीत, गेल्या 24 तासांत देशात 100 पेक्षा कमी मृत्यूची नोंद झाली आहे, जी गेल्या साडेआठ महिन्यातील नीचांकी पातळी आहे. यापूर्वी 15 मे 2020 रोजी 100 मृत्यूची नोंद झाली होती.
मागील 5 आठवड्यांमधील सरासरी दैनंदिन मृत्यूत देखील अशीच घसरण दिसून येते. 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2021 दरम्यान सरासरी दैनंदिन मृत्यू 128 इतके आहेत, तर 30 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत 242 सरासरी दैनंदिन मृत्यूची नोंद झाली आहे.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या देखील आज कमी होऊन 1.63 लाख (1,63,353) झाली आहे. सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या देशातील एकूण बाधित रुग्णांच्या केवळ 1.52% आहे.
भारतात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1.04 कोटी (1,04,48,406) इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.05% आहे.
2 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 8 पर्यंत, देशभरात कोविड-19 लसीकरणाअंतर्गत एकूण 39.50 लाख (39,50,156) लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
S. No.
|
State/UT
|
Beneficiaries vaccinated
|
1
|
A & N Islands
|
2,727
|
2
|
Andhra Pradesh
|
1,87,252
|
3
|
Arunachal Pradesh
|
9,791
|
4
|
Assam
|
39,724
|
5
|
Bihar
|
1,84,215
|
6
|
Chandigarh
|
3,803
|
7
|
Chhattisgarh
|
76,705
|
8
|
Dadra & Nagar Haveli
|
832
|
9
|
Daman & Diu
|
441
|
10
|
Delhi
|
64,711
|
11
|
Goa
|
4,509
|
12
|
Gujarat
|
2,56,097
|
13
|
Haryana
|
1,26,759
|
14
|
Himachal Pradesh
|
33,434
|
15
|
Jammu & Kashmir
|
26,634
|
16
|
Jharkhand
|
48,057
|
17
|
Karnataka
|
3,16,228
|
18
|
Kerala
|
1,93,925
|
19
|
Ladakh
|
1,234
|
20
|
Lakshadweep
|
807
|
21
|
Madhya Pradesh
|
2,98,376
|
22
|
Maharashtra
|
3,10,825
|
23
|
Manipur
|
4,373
|
24
|
Meghalaya
|
4,564
|
25
|
Mizoram
|
9,932
|
26
|
Nagaland
|
3,998
|
27
|
Odisha
|
2,07,462
|
28
|
Puducherry
|
2,988
|
29
|
Punjab
|
59,285
|
30
|
Rajasthan
|
3,33,930
|
31
|
Sikkim
|
2,166
|
32
|
Tamil Nadu
|
1,12,687
|
33
|
Telangana
|
1,68,771
|
34
|
Tripura
|
31,190
|
35
|
Uttar Pradesh
|
4,63,793
|
36
|
Uttarakhand
|
37,505
|
37
|
West Bengal
|
2,66,407
|
38
|
Miscellaneous
|
54,019
|
Total
|
39,50,156
|
गेल्या 24 तासांत 3,516 सत्रांमध्ये 1,91,313 आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण करण्यात आले.
आतापर्यंत 72,731 सत्रे घेण्यात आली आहेत.
दररोज लसीकरण केल्या जाणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ दिसून येत आहे.
गेल्या 24 तासामध्ये 13,423 रूग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
काल बरे झालेल्या रुग्णांपैकी 85.09% रुग्ण 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशात आहेत.
केरळमध्ये काल एका दिवसात 5,215 इतके सर्वाधिक रुग्ण बरे झाले. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 3,289 रुग्ण बरे झाले आणि त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 520 रुग्ण बरे झाले.
दैनंदिन नवीन रुग्णांपैकी 80.10% रुग्ण 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
केरळमध्ये काल सर्वाधिक 3,459 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल महाराष्ट्रात 1,948 तर तामिळनाडूमध्ये 502 नवीन रुग्ण आढळले.
कोविड -19 व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये आरोग्य प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी केंद्र सरकारने केरळ व महाराष्ट्रात उच्च-स्तरीय पथके तैनात केली आहेत.
गेल्या चोवीस तासांत 94 मृत्यूची नोंद झाली आहे.
दररोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये 65.96% मृत्यू पाच राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू (27) झाले असून केरळमध्ये 17 मृत्यू आणि तमिळनाडूत 7 लोकांचा मृत्यू.झाला आहे.
गेल्या 24 तासांत सोळा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
U.Ujgare/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1694379)
Visitor Counter : 225