पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कोरापूत रस्ते अपघातातील पीडितांना सानुग्रह अनुदान मंजूर केले.
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2021 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशातील कोरापूत येथे रस्ते अपघातात मृत झालेल्यांच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.
गंभीर जखमींना 50,000 रुपये द्यायलाही त्यांनी मान्यता दिली आहे.
“ओदिशातील कोरापूत येथे झालेल्या दुर्दैवी रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या वारसांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान तर गंभीर जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील." असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विट संदेशात म्हटले आहे.
***
M.Iyengar/V.Joshi/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1694214)
आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam