आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
सक्रीय रुग्ण संख्येत घट जारी राखत भारतातली सक्रीय रुग्णसंख्या 1.71 लाख
सुमारे 30 लाख लाभार्थींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण
Posted On:
29 JAN 2021 2:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2021
भारतातली एकूण सक्रीय रुग्ण संख्या उतरता आलेख दर्शवत असून ती आज 1.71 लाख झाली आहे.
सध्याची सक्रीय रुग्ण संख्या ही भारताच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 1.60% आहे.
जगाशी तुलना करता भारतातल्या दहा लाख लोकसंख्येमागे असलेली रुग्ण संख्या ही सर्वात कमी रुग्ण संख्या असणाऱ्या देशांपैकी आहे. भारतात हे प्रमाण 7,768 आहे. जर्मनी, रशिया,इटली, ब्राझील,फ्रान्स, ब्रिटन,अमेरिका या देशांमध्ये दहा लाख लोकसंख्येमागे असलेली रुग्ण संख्या खूपच जास्त आहे.
17 राज्ये/केंद्र शासित प्रदेशात दहा लाख लोकसंख्येमागे असलेली रुग्णसंख्या राष्ट्रीय सरासरी (7,768) पेक्षा कमी आहे.
भारतातल्या एकूण चाचण्यांची संख्या 19. 5 कोटीपेक्षा जास्त (19,50,81,079) झाली आहे.
गेल्या 24 तासात 7,42,306 चाचण्या झाल्या.
राष्ट्रीय पॉझीटीव्हीटी दर कमी होऊन हा दर 5.50% झाला आहे.
29 जानेवारी 2021 ला सकाळी 8 वाजेपर्यंत सुमारे 30 लाख (29,28,053) लाभार्थींनी देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियाना अंतर्गत लस घेतली.
गेल्या 24 तासात 10,205 सत्रात, 5,72,060 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली.आतापर्यंत 52,878 सत्रे झाली आहेत.
दर दिवशी लसीकरण होणाऱ्या लाभार्थींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
लसीकरण झालेल्या लाभार्थींपैकी 72.46% लाभार्थी 10 राज्यातले आहेत. लसीकरण झालेल्या लाभार्थींची उत्तर प्रदेशात मोठी संख्या आहे, त्यानंतर कर्नाटक आणि राजस्थान यांचे स्थान आहे.
कोरोनातून बरे झालेल्यांची भारतातली एकूण संख्या आज 1.03 कोटी (1,03,94,352) असून रुग्ण बरे होण्याचा दर 96.96% झाला आहे.
गेल्या 24 तासात देशात 18,855 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 20,746 रुग्ण बरे झाले.
छत्तीसगडमध्ये 6,451 रुग्णांची नोंद झाली आणि 6,479 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून 35 मृत्यूंची नोंद झाली आहे. घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या आणि मृत्यूची संख्या याबाबत राज्य आणि जिल्हा स्तरावरच्या आकडेवारीचा मेळ घातल्याने आकड्यांमध्ये वाढ झाल्याचे राज्य आरोग्य विभागाने म्हटले आहे.
बरे झालेल्या पैकी 85.36% हे 7 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
छत्तीसगडमध्ये एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 6,479 जण कोरोनामुक्त झाले.केरळ मध्ये 5,594 तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3,181 जण बरे झाले.
नव्या रुग्णांपैकी 85.73% रुग्ण पाच राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
छत्तीसगडमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 6,451 नवे रुग्ण आढळले. घरी सोडण्यात आलेल्यांची संख्या आणि मृत्यूची संख्या याबाबत राज्य आणि जिल्हा स्तरावरच्या आकडेवारीचा मेळ घातल्याने आकड्यांमध्ये वाढ झाल्याचा उल्लेख याआधी करण्यात आला आहे. केरळमध्ये 5,771आणि महाराष्ट्रात 2,889 नव्या रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात 163 मृत्यूंची नोंद झाली. या मृत्यूंपैकी 85.89% मृत्यू 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 50 मृत्यूंची नोंद झाली. छत्तीसगड मध्ये 35 आणि केरळमध्ये 19 मृत्यूंची नोंद झाली.
19 राज्ये/केंद्र शासित प्रदेशात दहा लाख लोकसंख्येमागे असलेली मृत्यू संख्या राष्ट्रीय सरासरी (112) पेक्षा कमी आहे.
* * *
U.Ujgare/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1693173)
Visitor Counter : 175