रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
संशोधन आणि विकास यांच्याद्वारे इलेक्ट्रीक वाहनांना पर्यायी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्याची गडकरींनी व्यक्त केली आवश्यकता
Posted On:
28 JAN 2021 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2021
वेगाने प्रत्यक्षात येत असलेल्या इलेक्ट्रीक वाहनांचे युग लक्षात घेऊन सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या वाहनांच्या बॅटरीज (विद्युतघट) तसेच वाहनांसाठीच्या पॉवरट्रेन तंत्रज्ञानाच्या पर्यायावर संशोधन करण्याचे तसेच त्यांची निर्मिती करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
या वाहनामध्ये लिथियम-अयॉन रिचार्जेबल बॅटरी वापरली जाते. लिथियमच्या साठ्यावरील धोरणात्मक नियंत्रणामुळे सध्या अनेक प्रश्नांचा सामना करावा लागतो आहे, म्हणूनच इलेक्ट्रीक वाहन उद्योगाने येत्या काळात संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या बॅटरी तंत्रज्ञानाकडे वळण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. त्यासाठी धातू-अण्विक वा इतर संभाव्य पर्यांयांचे संशोधन व निर्मितीची शक्यता पडताळून पहाणे आवश्यक आहे.
वाहतूक क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे उद्दीष्ट साध्य करण्याची गरज नमूद करतानाच गडकरी यांनी आपल्याकडील मान्यवर संस्था, उद्योगक्षेत्र, वैज्ञानिक, अभियंते व शासनाने येता कालखंड हा पर्यायी विद्युतघट तंत्रज्ञानावर संशोधन व निर्मितीला वाहून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
Jaydevi P.S /V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1692942)
Visitor Counter : 331