आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतातील सक्रिय रुग्णसंख्येत आणखी घट होऊन ती 1.92 लाख झाली


आज सकाळी 7 वाजेपर्यंत 8 लाखाहून अधिक आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले

17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी

Posted On: 21 JAN 2021 2:40PM by PIB Mumbai

 

आज भारतातील सक्रिय प्रकरणे 1,92,308 इतकी आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सक्रिय रुग्णांचा वाटा आता कमी होऊन 1.81% झाला आहे.

दररोज बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने आणि नवीन रुग्णसंख्या कमी होत असल्याने एकूण सक्रिय रुग्णसंख्येत घट होत आहे. गेल्या 24 तासात एकूण सक्रिय प्रकरणात 4,893 ची घट नोंदवण्यात आली.

राष्ट्रीय स्तरावर सक्रिय प्रकरणांमध्ये सातत्याने घसरणीचा कल असल्याने 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. भारतात दर दशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णांचे प्रमाण 7,689 आहे.

देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 73% हे केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यात आहेत.

21 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत एकूण 8,06,484 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. गेल्या 24 तासांत 2,398 सत्रामध्ये 1,31,649 लोकांना लस देण्यात आली. आत्तापर्यंत 14,118 सत्रे घेण्यात आली आहेत.

S. No.

State/UT

Beneficiaries vaccinated

1

A & N Islands

644

2

Andhra Pradesh

91,778

3

Arunachal Pradesh

3,023

4

Assam

7,585

5

Bihar

47,433

6

Chandigarh

469

7

Chhattisgarh

16,255

8

Dadra & Nagar Haveli

125

9

Daman & Diu

94

10

Delhi

12,902

11

Goa

426

12

Gujarat

21,832

13

Haryana

30,402

14

Himachal Pradesh

5,094

15

Jammu & Kashmir

4,414

16

Jharkhand

11,641

17

Karnataka

1,21,466

18

Kerala

24,269

19

Ladakh

240

20

Lakshadweep

369

21

Madhya Pradesh

27,770

22

Maharashtra

52,055

23

Manipur

1454

24

Meghalaya

1365

25

Mizoram

1508

26

Nagaland

2,988

27

Odisha

68,743

28

Puducherry

759

29

Punjab

7,607

30

Rajasthan

32,379

31

Sikkim

573

32

Tamil Nadu

33,670

33

Telangana

69,405

34

Tripura

3,734

35

Uttar Pradesh

22,644

36

Uttarakhand

6,119

37

West Bengal

46,310

38

Miscellaneous

26,940

Total

8,06,484

 

गेल्या 24 तासांत 19,965 रुग्ण बरे झाले आहेत.

एकूण 10,265,706 रुग्ण बरे झाल्याने रुग्ण बरे होण्याचा दर आता 96.75% झाले आहे.

नव्याने बरे झालेल्यांपैकी 87.06% हे 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

केरळमध्ये एका दिवसात सर्वाधिक 7,364 रुग्ण बरे झाले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात 4,589 नवीन रुग्ण बरे झाले आहेत.

नवीन रुग्णांपैकी 83.84% हे आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधले आहेत.

केरळमध्ये गेल्या चोवीस तासांत दररोजच्या सर्वाधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 6,815 इतके नवीन रुग्ण आढळले. तर काल महाराष्ट्रात 3,015 आणि छत्तीसगडमध्ये 594 नवीन प्रकरणे नोंदली गेली.

गेल्या 24 तासांत झालेल्या 151 मृत्यूंपैकी 83.44% आठ राज्ये / केंद्रशासित पप्रदेशातील आहेत.

महाराष्ट्रात 59 मृत्यूंची नोंद झाली. केरळ आणि छत्तीसगडमध्ये अनुक्रमे 18 आणि 10 नवीन मृत्यूची नोंद झाली.

19 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे मृत्यू दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. भारतात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे 111 मृत्यू होतात तर मृत्यूचे प्रमाण 1.44% आहे.

दुसरीकडे, 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे मृत्यू दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

***

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1690826) Visitor Counter : 157