मंत्रिमंडळ

850 मेगावॅट रटल जलविद्युत प्रकल्पासाठी 5281.94 कोटी रुपये गुंतवणूकीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 20 JAN 2021 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील किश्तवार जिल्ह्यातील चिनाब नदीवरील 850 मेगावॅट रटल जलविद्युत प्रकल्पासाठी 5281.94 कोटी रुपये गुंतवणूकीला मंजुरी दिली आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (एनएचपीसी) आणि जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ लिमिटेड (जेकेएसपीडीसी) यांच्यात अनुक्रमे 51% आणि 49% भागीदारीसह नवीन कंपनी (जेव्हीसी) स्थापन केली जाईल.

ठळक वैशिष्ट्ये:

रटल जलविद्युत प्रकल्पासाठी केंद्र सरकार देखील जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाला उभारणीसाठी स्थापना करण्यात येणाऱ्या संयुक्त कंपनीत जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ लिमिटेडच्या इक्विटी योगदानासाठी 776.44 कोटी रुपये अनुदान देऊन सहाय्य करत आहे. एनएचपीसी त्याच्या अंतर्गत संसाधनातून 808.14 कोटी रुपये समभागात गुंतवेल. रटल जलविद्युत प्रकल्प 60 महिन्यांच्या कालावधीत उभारला जाईल.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690502) Visitor Counter : 363