पंतप्रधान कार्यालय

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीतील धुपगुरी येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर

Posted On: 20 JAN 2021 12:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2021

 

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीतील धुपगुरी येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

"जलपाईगुडी (पश्चिम बंगाल) मधील धुपगुरी येथे झालेला रस्ते अपघात अत्यंत क्लेशदायी आहे. या दुःखद प्रसंगी शोकग्रस्त कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरच बरे वाटो." अशा भावना पंतप्रधानांनी ट्विटद्वारे व्यक्त केल्या आहेत.

पश्चिम बंगालमधील अपघातात प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील.

 

 

* * *

U.Ujgare/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1690289) Visitor Counter : 196