निती आयोग
नीती आयोग इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 ची दुसरी आवृत्ती सुरू करणार
Posted On:
19 JAN 2021 11:47AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
नीती आयोग 20 जानेवारी रोजी एका आभासी कार्यक्रमात इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 ची दुसरी आवृत्ती जारी करणार आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार हे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स जारी करतील.
पहिली आवृत्ती ऑक्टोबर 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती -निर्देशांकातील दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन देशाला नावीन्यपूर्ण अर्थव्यवस्थेत परिवर्तित करण्याप्रति सरकारची वचनबद्धता दर्शवते.
इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 नाविन्यपूर्ण संशोधनाला हातभार लावण्याच्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीच्या आधारे त्यांची क्रमवारी ठरवते आणि त्यांची ताकद व त्रुटी अधोरेखित करुन अभिनवता धोरण सुधारण्यासाठी त्यांना सक्षम बनवते. नाविन्यपूर्ण संशोधनातून राष्ट्रीय नेत्यांकडून राज्ये धडे घेतील, अशा पद्धतीने क्रमवारीची पद्धत तयार केली आहे. यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निकोप स्पर्धा होईल आणि त्याद्वारे स्पर्धात्मक संघीयवाद वाढीस लागेल, अशी आशा आहे.
कामगिरीची प्रभावीपणे तुलना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 17 ‘प्रमुख राज्ये’, 10 ‘ईशान्य आणि पर्वतीय राज्ये ’ आणि 9 ‘शहर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश’ मध्ये विभागले आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परिणाम आणि प्रशासन या दोन व्यापक श्रेणींच्या आधारे मानांकन देण्यात आले आहे. एकूणच, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 च्या चौकटीत 36 निर्देशकांचा समावेश आहे, ज्यात हार्ड डेटा (32 निर्देशांक ) आणि चार संमिश्र निर्देशकांचा समावेश आहे.
इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020 नवीन मेट्रिक्स आणि भारतीय नाविन्यपूर्ण परिसंस्थेचा समग्र दृष्टीकोन प्रदान करून मागील वर्षाच्या पद्धतीवर आधारित आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील विशिष्ट मापदंड कायम ठेवून, नाविन्यतेचे मोजमाप करण्यासाठी जागतिक स्तरावर विचारात घेण्यात आलेले निकष (जसे की संशोधन आणि विकासासाठी खर्च केलेल्या एकूण देशांतर्गत उत्पादनांची टक्केवारी) समाविष्ट करण्यासाठी या चौकटीत सुधारणा करण्यात आली आहे.
निर्देशांक कल स्वीकारून देश, राज्य आणि जिल्हा पातळीवर नवसंशोधनाला प्रेरक विविध घटकांचे तपशीलवार विश्लेषण प्रदान करतो. ही विश्लेषणे राष्ट्रीय आणि उप-राष्ट्रीय स्तरावर नवसंशोधनाचे उत्प्रेरक आणि प्रतिबंधकांना ओळखण्यात धोरणकर्त्यांना मदत करतील, अशी अपेक्षा आहे.
हा कार्यक्रम https://www.youtube.com/watch?v=i7AD_1uc0Is&feature=youtu.be वर थेट प्रसारित होईल.
U.Ujgare/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689905)
Visitor Counter : 228
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam