कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
प्रधानमंत्री कौशल विकास योजना 3.0 भारतातली दुर्गम खेडी आणि शहरांपर्यंत कौशल्य विकास पोहचवेल, राज्ये आणि जिल्ह्यांवर अधिक जबाबदारी : डॉ महेंद्र नाथ पांडे
8 लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचे प्रधानमंत्री कौशल विकास योजना 3.0 चे उद्दिष्ट
Posted On:
15 JAN 2021 10:17PM by PIB Mumbai
भारताच्या युवकांना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षित करण्याच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या उपक्रमा अंतर्गत प्रधानमंत्री कौशल विकास योजना 3.0 (पीएमकेव्हीवाय) ची आज सुमारे 600 जिल्ह्यात सुरवात करण्यात आली. या अंतर्गत 300 पेक्षा जास्त कौशल्य अभ्यासक्रम युवकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मागणीला अनुसरून आणि विकेंद्रित दृष्टीकोन ठेवत कौशल्य विकास साधण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे यांनी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्य मंत्री आर के सिंह यांच्यासह पीएमकेव्हीवायच्या तिसऱ्या टप्याची दुरदृष्य प्रणाली द्वारे सुरवात केली.
स्थानिक अर्थव्यवस्थेला सहाय्य करण्याच्या उद्देशाने पीएमकेव्हीवायच्या तिसऱ्या टप्याची सुरवात करण्यात आली असून जागतिक आणि स्थानिक स्तरावर बदलती मागणी लक्षात घेऊन याची आखणी करण्यात आली आहे.
717 जिल्ह्यात, 28 राज्ये/8 केंद्रशासित प्रदेशात सुरु करण्यात आलेली पीएमकेव्हीवाय- तिसरा टप्पा म्हणजे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेल आणखी एक पाऊल आहे. हा टप्पा अधिक विकेंद्रित पद्धतीने राबवण्यात येणार असून राज्ये/ केंद्र शासित प्रदेश आणि जिल्ह्यांवर अधिक जबाबदारी येणार आहे.
राज्य कौशल्य विकास मिशन अंतर्गत, जिल्हा कौशल्य समित्या महत्वाची भूमिका बजावणार असून जिल्हा स्तरावर मागणी लक्षात घेऊन कौशल्य संबंधित तफावत कमी करण्याचे काम या समित्या करतील. आकांक्षी भारताच्या आकांक्षा लक्षात घेत नव्या योजना अधिक प्रशिक्षणार्थी केन्द्री असेल.
कौशल्य परिसंस्थेला चालना देण्यामध्ये पीएमकेव्हीवाय 2.0 ने मोलाची भूमिका बजावली आहे तर पीएमकेव्हीवाय 3.0 मुळे, मागणी लक्षात घेत कौशल्य विकास, डिजिटल तंत्रज्ञान आणि उद्योग 4.0 कौशल्य यावर लक्ष केंद्रित करत कौशल्य विकासामध्ये नव्या अध्यायाची सुरवात होणार आहे. आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल हा मंत्र घेऊन सरकार विकास योजना राबवत आहे. हे लक्षात घेऊनच पीएमकेव्हीवाय 3.0 मध्ये राज्य, जिल्हा आणि गट स्तरावर जास्त जबाबदारी देण्यात आली आहे.
पीएमकेव्हीवाय 3.0 मध्ये नव्या युगाची कौशल्ये आणि उद्योग 4.0 रोजगार विकसित करण्याला आणि मागणी – पुरवठा यामधली दरी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
समावेशी विकास आणि रोजगाराभिमुखता वाढावी या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व्यावसायिक प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे तर पीएमकेव्हीवाय 3.0 मध्ये उद्योग संलग्न संधी युवकांना प्राप्त व्हाव्यात यासाठी सुरवातीच्या स्तरावरच व्यावसायिक प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे.
जिल्हा स्तरावर कौशल्य परीरचना अधिक विकसित करून पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकलचे स्वप्न साकारता येईल असे डॉ पांडे यावेळी म्हणाले. भारत जगाची कौशल्य राजधानी ठरावा यासाठीच्या संधींचा आपण युवा देश म्हणून जास्तीत जास्त उपयोग करायला हवा असे ते म्हणाले.
स्थानिक स्तरावर असलेली मागणी लक्षात घेऊन पीएमकेव्हीवाय 3.0 युवकांना प्रशिक्षित करत संधीशी सांगड घालणार आहे. .
कौशल्य हे केवळ उद्दिष्ट नसून देशाच्या आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक बाब असल्याचे आर के सिंग यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक मागणीची पूर्तता करणारे अतिरिक्त अभ्यासक्रम देण्याचे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी उमेदवारांना दिले.
एल अँन्ड टी समूह अध्यक्षांनी यावेळी दुरदृष्य प्रणाली द्वारे संबोधित केले आणि मुंबईत एल अँन्ड टी ट्रेनर अकादमी सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली.
कौशल्य विकास बाबत अधिक माहितीसाठी या लिंकवर मिळेल
PMKVY Facebook: www.facebook.com/PMKVYOfficial
Skill India Facebook: www.facebook.com/SkillIndiaOfficial
Skill India Twitter: www.twitter.com/@MSDESkillindia
Skill India YouTube: https://www.youtube.com/channel/UCzNfVNX5yLEUhIRNZJKniHg
Jaydevi PS/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688952)
Visitor Counter : 367
Read this release in:
Malayalam
,
English
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Urdu
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada