रसायन आणि खते मंत्रालय

चालू आर्थिक वर्षात जन औषधी केंद्रांतून 484 कोटी रुपयांची विक्रमी विक्री

Posted On: 14 JAN 2021 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जानेवारी 2021

 

चालू आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये (12 जानेवारी 2021 पर्यंतच्या) देशातील सर्व जिल्ह्यांमधील दर्जेदार जेनेरिक औषधे विकल्या जाणाऱ्या 7064 प्रधानमंत्री  भारतीय जन औषधी केंद्रांमधे 484 कोटी  रुपयांच्या औषधांच्या विक्रीची नोंद झाली. मागील आथिर्क वर्षाच्या तत्सम आकडेवारीपेक्षा हा आकडा 60% नी अधिक आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांच्या खर्चात अंदाजे 3000 कोटी रुपयांची बचत झाली आहे. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी आज कर्नाटकात ही घोषणा केली.

सन 2019-2020 या आर्थिक वर्षात भारत सरकारने जन औषधी केंद्रासाठी 35.51 कोटी रुपये निधी दिला होता, त्यामुळे नागरिकांची 2600 कोटी रुपयांची बचत झाली. अशाप्रकारे सरकारने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयामागे नागरिकांचे प्रत्येकी 74 रुपये वाचले. त्याचा बहुगुणित प्रभाव झाला आहे,असेही गौडा म्हणाले.

देशभरातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी पाऊल टाकत आजपर्यंत जन औषधी केंद्रात “सुविधा” सॅनिटरी पॅड प्रत्येकी 1 रुपया या प्रमाणे 10 कोटीपेक्षा जास्त पॅड तेथे विकले गेले आहेत. जन औषधीच्या “सुविधा” सॅनिटरी पॅड खरेदीसाठीची 3.6 कोटी रुपयांची ऑर्डर डिसेंबर 2020 मध्ये दिली आहे. तसेच जन औषधीच्या “सुविधा” सॅनिटरी पॅड खरेदीसाठीची 30 कोटी रुपयांची निविदाही नक्की करण्यात आली आहे.

कर्नाटक विषयी बोलताना गौडा म्हणाले की, सध्या कर्नाटकात 788 प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे परवडणारी, उच्च-गुणवत्तेची जेनेरिक औषधे देऊन नागरिकांची सेवा करीत आहेत. मार्च 2021 पर्यंत राज्यात एकूण 800 पीएमबीजेके सुरू करण्याचे कर्नाटकाचे लक्ष्य आहे. वैद्यकीय क्षेत्रातील औषधोपचारांसह आरोग्य क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी करत कर्नाटकमधील पीएमबीजेपी केंद्रांचे मार्च, 2021 पर्यंत 125  कोटी रुपयांच्या विक्रीचे उद्दिष्ट आहे

 

* * *

S.Tupe/S.Partagonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1688592) Visitor Counter : 266