आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिनाच्या वेळापत्रकात बदल, आता 31 जानेवारी 2021 रोजी पोलिओ लसीकरण होणार
राष्ट्रपती 30 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय लसीकरण दिनाचा शुभारंभ करणार
Posted On:
14 JAN 2021 1:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जानेवारी 2021
देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहीम पंतप्रधानांच्या हस्ते 16 जानेवारी 2021 पासून सुरू केली जाणार आहे. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून राष्ट्रीय लसीकरण दिन (एनआयडी) किंवा “पोलिओ रविवार” म्हणून ओळखल्या जाणार्या पोलिओ लसीकरण दिनाचा कार्यक्रम 31 जानेवारी 2021 (रविवार) रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रपती 30 जानेवारी 2021 रोजी (शनिवारी) सकाळी 11.45 वाजता राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ लसीचे थेंब देऊन पोलिओ राष्ट्रीय लसीकरण दिनाचा शुभारंभ करतील.
कोविड व्यवस्थापन आणि लसीकरण सेवा तसेच बिगर कोविड अत्यावश्यक आरोग्य सेवा एकमेकांवर विपरित परिणाम न होता सुरु राहाव्यात या आरोग्य मंत्रालयाच्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
* * *
U.Ujgare/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688501)
Visitor Counter : 1092
Read this release in:
Odia
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam