संरक्षण मंत्रालय
उद्या,14 जानेवारी 2021 रोजी ज्येष्ठ सैनिक दिनानिमित्त सैनिकांना अभिवादन
Posted On:
13 JAN 2021 7:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021
भारतीय सैन्यदले उद्या म्हणजेच 14 जानेवारी 2021 रोजी ज्येष्ठ सैनिक दिवस साजरा करणार आहेत. भारताचे पहिले लष्करप्रमुख फिल्डमार्शल के एम करीअप्पा–OBE 1953 साली याच दिवशी सैन्यातून निवृत्त झाले होते, त्याचे औचित्य साधत हा दिवस ज्येष्ठ सैनिक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या निवृत्त आणि दिवंगत सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या निःस्वार्थ सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उद्या देशातील अनेक लष्करी तळांवर पुष्पचक्र वाहण्याचे तसेच सैनिकांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत बेंगरूळू इथल्या हवाईतळावर होणाऱ्या निवृत्त जवानांच्या मेळाव्यात उपस्थित राहतील. ज्येष्ठ सैनिक, विविध निवृत्त सेवा अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
राजधानी दिल्लीत सकाळी या दिनाच्या सोहळ्याची सुरुवात राष्ट्रीय युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन केली जाईल. सध्या कोविड प्रतिबंधांमुळे मर्यादित प्रमाणात उपस्थिती असेल.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1688344)
Visitor Counter : 237