भूविज्ञान मंत्रालय
                
                
                
                
                
                
                    
                    
                        भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या दरम्यान शास्त्रीय व तांत्रिक सहयोगाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                13 JAN 2021 5:41PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 13 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने संयुक्त अरब अमिरातीच्या नॅशनल सेंटर फॉर मेटर्लजी (NCM) व भारतातील भूपृष्ठ विज्ञान मंत्रालय (MoES) यांच्या दरम्यान शास्त्रीय व तंत्रज्ञान विषयी सहयोगाविषयीच्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली.
या सामंजस्य कराराच्या माध्यमातून ज्ञान, माहिती तसेच हवामानासंबधी, भूपृष्ठ व सागरी सेवा यांच्याशी संबधित सेवांमधील रडार, उपग्रह, भरती गेज, भूकंप व हवामान स्थानके अशी उपकरणे यांचे आदानप्रदान केले जाईल.
	- या माध्यमातून संशोधन, प्रशिक्षण, सल्लामसलत, हवामानविषयक माहिती सेवा, मासेमारीसाठीची  ठिकाणे तसेच विषुववृत्तीय वादळे यांच्या अनुमानासाठी डेटाचा उपयोग करणे अश्या अनेक बाबींशी संबधित अनुभवांची देवाणघेवाण तसेच शास्त्रज्ञ, संशोधन करणारे व तज्ञ यांच्या परस्पर देशांत भेटी/माहितींचे आदानप्रदान होईल.
- सामायिक स्वारस्य असणाऱ्या बाबी बद्दलची शास्त्रीय तसेच तांत्रिक माहितीचे आदानप्रदान.
- सामंजस्य करारात  नमूद केलेल्या सहकार्यक्षेत्रांमध्ये येणाऱ्या समस्या तसेच दोन्ही बाजूंना स्वारस्य असणाऱ्या बाबींमधील समस्या सोडवण्याच्या दृष्टीने द्विपक्षीय परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे, संमेलने यांचे आयोजन.
- दोन्ही पक्षांची परस्पर सहमती असलेली इतर सहयोगाची क्षेत्रे.
- सागरी विभागात परस्पर सहमतीने हवामानाचा  अंदाज घेण्यासाठी हवामान निरीक्षण नेटवर्क नियुक्त करणे.
- ओमानच्या उत्तरी पूर्व भागावर परिणाम करणाऱ्या ओमान समुद्रातील तसेच  भारताच्या किनारी भागांवर परिणाम करणाऱ्या अरबी समुद्रातील संभाव्य त्सुनामींचा वेध घेण्यासाठी विशेष सुनामी मॉडेल विकसित करण्याच्या दृष्टीने सहकार्य.
- त्सुनामींचा अंदाज वर्तवण्याच्या दृष्टीने सुनामी अर्ली वॉचिंग सेंटरसाठीत्सुनामी अंदाज वर्तवणाऱ्या विशेष मॉडेलिंग सॉफ्टवेअर सारख्या माध्यमातून सहयोग.
- ज्या भूगर्भातील हालचालींमुळे अरबी समुद्र वा ओमानच्या समुद्रात त्सुनामी संभवते असा भारताचा दक्षिण तसेच पश्चिम भागातील काही भूकंपमापक स्थानकांदरम्यानचा तसेच ओमानच्या पश्चिमेकडील भागातील भूगर्भहालचालींचा रियल टाइम डेटा यांचे आदानप्रदान.
- अरबी समुद्र वा ओमानचा समुद्र यातील त्सुनामीची शक्यता वाढवणाऱ्या भूगर्भ हालचालींच्या अभ्यास क्षेत्रात परस्पर सहयोग.
- माहितीच्या आदानप्रदानातून धूळीची तसेच वाळूची  वादळे यांचा आगाऊ अंदाज वर्तवण्यासाठी सहकार्य.
 
U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar
 
 
 
 
 
 
 
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1688300)
                Visitor Counter : 231
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada