संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले अटल बोगदा या विषयावरील वेबिनारचे उद्घाटन; अशा महान संरचनांचा निर्मितीसाठी राष्ट्रीय अभिमानाचा भाव सर्वतोपरी महत्त्वाचा असल्याचे संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
11 JAN 2021 5:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2021
अटल बोगदा बांधताना आलेले अनुभव, आयआयटी, एनआयटी आणि इतर तंत्रज्ञान संस्थांमधील विद्यार्थ्यांबरोबर सामायिक करण्यासाठी बीआरओ अर्थात सीमा रस्ते संघटनेने 11 जानेवारी रोजी अटल बोगदा या विषयावर वेबिनार आयोजित केला होता. दिवसभर चालणाऱ्या या वेबिनारचे उद्घाटन करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कोविड-19 निर्बंधांमुळे अनेक तांत्रिक अडचणी असूनही हा अभियांत्रिकी चमत्कार घडविल्याबद्दल बीआरओच्या अभियंत्यांचे कौतुक केले. परदेशी अभियंत्यांसमोर गंभीर आव्हान असणाऱ्या आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक सेरी नाला या ठिकाणी काम करून आमच्या अभियंत्यांनी आव्हानांवर विजय मिळविला असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. अटल बोगद्यासारख्या उत्कृष्ट निर्माणासाठी केवळ विटा आणि सिमेंट-रेतीचे मिश्रण महत्वाचे नाही तर त्यामागील राष्ट्रीयत्वाची भावना महत्वाची आहे असे संरक्षणमंत्री म्हणाले. भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंता यांच्या भूतकाळातील विविध कामगिरीची आठवण करून देताना संरक्षणमंत्री म्हणाले की त्यांनी नेहमीच विविध क्षेत्रात ठसा उमटवला आहे.

आत्मनिर्भर भारत अभियानाचा संदर्भ देताना राजनाथ सिंह म्हणाले, कोविड-19 आव्हानांवर मात करताना देशांतर्गत गरज भागविण्याबरोबरच अन्य देशांना पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर्सचा पुरवठा करण्यासाठी आमची संसाधने त्वरित एकत्रित करू शकलो. ते म्हणाले की, सीमावर्ती क्षेत्राच्या विकासाला सरकारने सर्वाधिक प्राथमिकता दिली आहे आणि बीआरओने आपले 67 टक्के कर्मचारी उत्तर सीमेवर तैनात केले आहेत. कोविड-19 निर्बंधांदरम्यान 2020 मध्ये बीआरओच्या प्रयत्नांची व कर्तृत्वाची प्रशंसा करताना संरक्षणमंत्री म्हणाले की बीआरओच्या अर्थसंकल्पात कोणतीही कपात झाली नाही.
3000 मीटर उंचीवरील जगातील सर्वात मोठा बोगदा (9.020 किमी) बनवताना आलेल्या अनुभवांची आणि आव्हानांची माहितीचा दस्तावेज असलेल्या एक विशेष संकलन यावेळी संरक्षण मंत्र्यांनी प्रकाशित केले.
* * *
Jaydevi PS/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687664)
Visitor Counter : 183