सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
भिंतीसाठी नाविन्यपूर्ण, पर्यावरण स्नेही आणि विषारी नसलेल्या रंगाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या उद्घाटन
Posted On:
11 JAN 2021 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जानेवारी 2021
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी 12 जानेवारीला, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण रंगाचे उद्घाटन त्यांच्या निवासस्थानी करणार आहेत. पर्यावरण स्नेही आणि विषारी नसलेला ‘खादी प्राकृतिक पेंट’ बुरशी रोधक आणि जीवाणू रोधक गुणधर्म असलेले नाविन्यपूर्ण उत्पादन आहे. गायीचे शेण या मुख्य घटकावर आधारित हा रंग कमी खर्चातला आणि गंध हीन असून भारतीय मानक ब्युरोने प्रमाणित केला आहे.
खादी प्राकृतिक पेंट, डीस्टेपर आणि प्लास्टिक इमल्शन अशा दोन स्वरुपात उपलब्ध होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरत या रंगाचे उत्पादन करण्यात येत आहे.खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अध्यक्षांनी या प्रकल्पाची संकल्पना मार्च 2020 मध्ये मांडली आणि त्यानंतर कुमारप्पा राष्ट्रीय हॅंडमेड पेपर इन्स्टिट्यूट जयपूर या आयोगाच्या युनिटने संकल्पना विकसित केली.
शिसे, पार, क्रोमियम, अर्सेनिक आणि इतर जड धातूपासून हा रंग मुक्त आहे. स्थानिक उत्पादनाला यामुळे चालना मिळणार असून तंत्रज्ञान हस्तांतरणा द्वारे शाश्वत स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. पर्यावरण स्नेही उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून गायीच्या शेणाचा वापर वाढून शेतकरी आणि गौशाला यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत मिळणार आहे. यातून शेतकरी/ गौशाला यांच्यासाठी प्रत्येक पशुमागे वार्षिक सुमारे 30,000 रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. गायीच्या शेणाचा उपयोग केल्याने पर्यावरण स्वच्छ राहण्यासाठी मदत होणार आहे.
खादी प्राकृतिक डीस्टेपर आणि इमल्शन रंगाच्या नॅशनल टेस्ट हाऊस मुंबई, श्री राम औद्योगिक संशोधन संस्था नवी दिल्ली, नॅशनल टेस्ट हाऊस गाझियाबाद या तीन नामांकित प्रयोग शाळांनी चाचण्या केल्या आहेत.
खादी प्राकृतिक इमल्शन BIS 15489:2013 मानकाची तर खादी प्राकृतिक डीस्टेपर BIS 428:2013 मानकाची पूर्तता करतो.
* * *
U.Ujgare/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1687612)
Visitor Counter : 594