आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात दैनंदिन नव्या रुग्ण संख्येत होणारी घट कायम, गेल्या 24 तासात 16,311 नवे रुग्ण


229 दिवसानंतर दैनंदिन मृत्यू 170 पेक्षा कमी

Posted On: 11 JAN 2021 1:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जानेवारी 2021


भारतात गेल्या अनेक दिवसांपासून दैनंदिन नव्या रुग्ण संख्येत होणारी घट कायम आहे. गेल्या 24 तासात 16,311 नव्या रुग्णांची नोंद झाली.

भारतात दैनंदिन मृत्यूंची संख्याही कमी होत आहे. 229 दिवसानंतर 170 पेक्षा कमी दैनंदिन  मृत्यूंची नोंद झाली आहे. नव्या रुग्णामध्ये घट आणि रुग्ण बरे होण्याचा उच्च दर यामुळे देशाच्या सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे.

भारतातली एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज  2.25 लाख (2,22,526) आहे. सध्याचे सक्रीय रुग्ण, एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या 2.13% आहेत.

गेल्या 24 तासात 16,959 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे एकूण सक्रीय रुग्ण संख्या 809 ने कमी झाली आहे.

एकूण बरे झालेल्यांची संख्या 10,092,909 झाली आहे. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यांच्यातले अंतर वाढत असून सध्या ते  सुमारे  99 लाख (98,70,383) आहे.

रुग्ण बरे होण्याचा दरही सुधारून आज  96.43% झाला आहे. जगातल्या सर्वाधिक दरापैकी हा एक दर आहे.

बरे झालेल्यांपैकी 78.56% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 4,659 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून त्याखालोखाल महाराष्ट्रात 2,302 आणि छत्तीसगडमध्ये 962 जण बरे झाले.

नव्या रुग्णांपैकी 80.25%  रुग्ण 9 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत. 

केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 4,545 कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 3,558 नव्या रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात 161 मृत्यूंची नोंद झाली.

या पैकी सुमारे 69.57%  मृत्यू 6  राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत. 

महाराष्ट्रात  सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन 34 मृत्यूंची नोंद झाली. केरळ मध्ये 23 आणि  पश्चिम बंगाल मध्ये 19   मृत्यूंची नोंद झाली.

 

* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1687599)