वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतीय उद्योग क्षेत्रात दर्जा व उत्पादनक्षमता यांना चालना देण्यासाठी उद्योगमंथन या क्षेत्रकेंद्रीत वेबिनार्स मॅरेथॉनचे आयोजन

Posted On: 05 JAN 2021 12:49PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2021


भारत सरकारच्या वाणिज्य आणि उदयोग मंत्रालयाच्या अखत्यारीतील उद्योग व अंतर्गत व्यापारवृद्धी प्रोत्साहन विभागातर्फे भारतीय उद्योग क्षेत्रात दर्जा व उत्पादनक्षमता यांना चालना देण्यासाठी भारतीय गुणवत्ता परिषद, राष्ट्रीय उत्पादकता परिषद व प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय यांच्या सहयोगाने ‘उद्योग मंथन’ म्हणजे विशिष्ठ क्षेत्र केंद्रीत वेबिनार्स मॅरेथॉन 4 जानेवारी 2021 ते 2 मार्च 2021 या कालावधीत आयोजित  करण्यात येत आहेत.

भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्री पियुष गोयल हे 6 जानेवारी 2021 रोजीच्या सत्राच्या अध्यक्षपदी असतील.

या वेबिनार शृंखलेची 45 सत्र असतील आणि त्यात उत्पादन व सेवा क्षेत्रातील विविध महत्वाच्या क्षेत्रांचा समावेश असेल प्रत्येक वेबिनार म्हणजे 2 तासांचे  सत्र असेल व त्यात एखाद्या विशिष्ठ क्षेत्रातील क्षेत्रीय तसेच व्यवसाय तज्ञाशी चर्चा होईल. उद्योग, चाचणी व प्रमाणीकरण या उपक्रमातील विविध प्रतिनिधी यात सहभागी होतील. या चर्चेचे युट्यूब च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले जाईल, जेणेकरून त्या-त्या क्षेत्रात स्वारस्य असणाऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल.

उद्योग मंथन हा उद्योगातील आव्हाने, संधी ओळखणे व त्यावर उपाययोजना वा रुढ उपाययोजना करणे यावर काम करेल. दर्जा व उत्पादनक्षमता सुधारण्य़ासाठी सर्व उद्योग व क्षेत्रे यांच्या मार्फत समजून घेत वोकल फॉर लोकलला चालना आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यात या चर्चा मदत करतील.

भारतीय उद्योग व्यवसायाने दर्जा व उत्पादनक्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे आणि त्या संबधीत बाबींवर सविस्तर व सर्वसमावेशक सत्रे घेणे आवश्यक आहे, असे पियुष गोयल यांनी म्हटले आहे. यामुळे देशाला उच्च दर्जा, कार्यक्षम उत्पादक तसेच व्यापार व सेवा पुरवठादार मिळतील, असे त्यांनी सांगितले.


* * *

U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1686202) Visitor Counter : 209