इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

जीएसटी ई-चलन प्रणालीचा तीन महिन्यांचा प्रवास पूर्ण; 37,000 पेक्षा जास्त करदात्यांना 1680 लक्ष चलन क्रमांक दिले

2020 नोव्हेंबर मध्ये 589लक्ष तर डिसेंबर 2020 मध्ये 603 लक्ष ई-चलन निर्मीत

Posted On: 02 JAN 2021 7:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2021


जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये ‘गेम चेंजर’ ठरलेलल्या ई- चलन प्रणालीने तीन महिन्यांचा प्रवास पूर्ण केला असून आता या नवीन मंचाच्या आधारे करदात्यांना सुरळीत सेवा मिळत आहे. आत्तापर्यंत 37000 करदात्यांनी 1680 लाखांपेक्षा जास्त चलन संदर्भ क्रमांकांची (आयआरएन) निर्मिती केली आहे. ‘एनआयसी’ने गेल्या तीन महिन्यापासून ई-चलन प्रणाली विकसित केली आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये 495 लाख ई-चलनांची निर्मिती झाली होती. त्यामध्ये नोव्हेंबर 2020 वाढ होऊन 589 लाख ई-चलन तयार करण्यात आले. डिसेंबर 2020 मध्ये हाच आकडा 603 लाखांपर्यंत वाढला. एनआयसीच्यावतीने ई-वे बिल प्रणाली विकसित करण्यात आली असून मागच्यावर्षीच्या याच महिन्यांच्या तुलनेमध्ये सप्टेंबर ते डिसेंबर 2020 मध्येही ई-वे बिलांची संख्या सर्वात जास्त नोंदवली गेली आहे.

या कार्यप्रणालीला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत असून चलन संदर्भ क्रमांक सुरळीत आणि वेळेवर देण्यात येत आहेत. मात्र एकाच दस्तऐवजांच्या क्रमांकावरून वारंवार येत असलेल्या विनंती, वैधता आणि गणना यांच्या त्रुटी लक्षात येत असल्यामुळे त्यावर उपाय योजना करण्यात येत आहे. यामध्ये करदात्यांना मेलव्दारे संपर्क करून संवाद साधण्यात येत आहे. यासाठी एनआयसीच्यावतीने ‘हेल्प डेस्क’च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच दूरध्वनीवरून सुधारणा करण्यासाठी उपाय संबंधितांना सांगण्यात येत आहेत. एनआयसीच्यावतीने आयआरएन निर्माण केल्यानंतर त्यांची संख्या आणि मूल्य यांचे दैनंदिन अद्यतन करण्यात येत आहे.

लहान करदात्यांच्या आवश्यकतांचा विचार करून एनआयसीने ऑफलाइन एक्सेल आधारित आयआरएन तयारी आणि मुद्रण साधने विकसित केली आहेत. त्याला ‘एनआयसी- जीईपीपी’ असे नाव देण्यात आले आहे. यामुळे करदात्यांना चलनाचा तपशील भरण्यास आणि एनआयसी आयआरएन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी फाइल तयार करणे, क्यू आर क्रमांकासह आयआरएन डाउनलोड करणे यांना परवानगी देण्यात येणार आहे.

* * *

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1685671) Visitor Counter : 75