आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड- 19 लसीकरणाच्या सराव फेरीसाठी विविध ठिकाणच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
Posted On:
01 JAN 2021 6:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021
उद्या म्हणजेच 2 जानेवारी 2021 रोजी होणाऱ्या कोविड -19 लसीकरणाच्या सराव फेरीसाठी देशभरातील विविध ठिकाणच्या सज्जतेचा आढावा घेण्याकरिता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज एक उच्चस्तरीय बैठक झाली.
उद्या देशभरात सराव फेरी गोंधळाविना पार पडावी यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांना दिली. यामध्ये सराव घेणाऱ्या चमूच्या प्रत्येक संभाव्य प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी टेलिफोन ऑपरेटरच्या संख्येत वाढ, ठिकाणांच्या प्रत्यक्ष तपासणीसाठी तालुका स्तरावर कृतीदलाची स्थापना, वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन यांचा समावेश आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यात योग्य समन्वय राखण्याची गरज आहे ज्यामुळे नंतर लसीकरण मोहिमेच्या व्यापक अंमलबजावणीला मदत होईल असे डॉ हर्षवर्धन यावेळी म्हणाले.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1685425)
Visitor Counter : 229