आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्राने राज्ये आणि  केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 लस वितरणासाठी सज्ज रहाण्यास सांगितले

Posted On: 31 DEC 2020 5:41PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारने देशभरात कोविड-19च्या लसीचे वितरण करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी  सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाची  पुरेशी तयारी सुनिश्चित करुन सज्ज रहाण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव श्री. राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 लसीकरण देण्याच्या जागांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य सचिवराष्ट्रीय आरोग्य मोहिमांचे (NHM MDs) व्यवस्थापकीय संचालक,आणि सर्व राज्ये /केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य व्यवस्थापकांची आज एक उच्चस्तरीय बैठक दृकश्राव्य माध्यमाद्वारे झाली.

दिनांक 2 जानेवारी 2021 शनिवार रोजी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत याची रंगीत तालीम म्हणजे ड्राय रन घेण्यात येईल. हा उपक्रम सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत कमीत कमी 3 ठिकाणी घेण्याचे नियोजित  केले असून त्यात काही राज्यांतील दुर्गम भागातील जिल्हे/जेथे सुविधा पोहोचणे कठीण असते अशा भागांत ही  तालीम ,ड्राय रन  होईल. महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांत त्यांच्या राजधानीखेरीज अनेक महत्वाच्या शहरांतूनही या  ड्राय रनचे नियोजन करण्यात आले आहे. 

कोविड-19 लसीकरण परीचय  ड्राय रन घेण्याचा उद्देश को-विनच्या(Co-WIN)अनुप्रयोगाच्या कार्यात्मक व्यावहारीकतेचे मूल्यमापन प्रत्यक्ष त्या वातावरणात करणे,नियोजन आणि अंमलबजावणी यातील दुव्यांची चाचपणी करणे आणि  अंमलबजावणी होण्यापूर्वी त्याचा मार्ग अग्रेषित करणे, हा आहे.यामुळे त्या कार्यक्रमातील विविध पातळीवरील व्यवस्थापकांचा आत्मविश्वास यामुळे वाढेल अशी अपेक्षा आहे.लसीकरणाच्या नियोजनाची सुरुवात मंत्रालयाने दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी जारी केलेल्या कार्यवाही मार्गदर्शक सूचनांनुसार होईल. तीनही सत्रांसाठी संबंधित मुख्य वैद्यकीय अधिकारी 25 चाचणी लाभार्थी (आरोग्य कर्मचारी)निवडतील.या लाभार्थ्यांची सर्व माहिती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना को-विनवर  अपलोड करण्यास सांगितले आहे.हे लाभार्थी ड्राय रनसाठी त्या स्थळांवर उपलब्ध असतील. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी  को-विन आवेदन पत्रावर त्या लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्याची माहिती आणि सुविधांची तयारी आणि अपलोड करण्याचे सांगितले आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशाांना त्या त्या राज्यातील राजधानीतील प्रस्तावित स्थळांच्या जागेचे पुरेसे प्रमाण,कार्यकारी व्यवस्था, इंटरनेट जोडणी, वीज, सुरक्षितता अशा गोष्टींसह  जागा  तयार करून त्यांचे भौतिक सत्यापन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे,तसेच कमीत कमी तीन प्रस्तावित जागा आदर्श जागा म्हणून दाखविण्यास प्रत्येक राज्याला सांगितले आहे. जवळपास 96,000 लसीकरण कर्मचाऱ्यांना या कामाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.2,360 कर्मचारी राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षणात तर  719 जिल्ह्यांत 57,000 प्रशिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात आले आहे.लसीकरण /साॅफ्टवेअर संदर्भात कोणतीही माहिती  प्राप्त करण्यासाठी राज्य मदत क्रमांक 104(1075 या क्रमांकाव्यतिरीक्त) आपापल्या राज्यांसाठी तयार करत आहे.

या ड्राय रनचे महत्त्वाचे लक्ष्य लसीकरण दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकाराचे व्यवस्थापन करता यावे हे आहे.

***

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1685116) Visitor Counter : 223