रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
गाडीचालकाच्या शेजारी बसलेल्या प्रवाशासाठी एअर बॅगच्या प्रस्तावित अनिवार्य तरतूदीसाठी जनतेकडून सूचना मागविण्यात येत आहेत
प्रविष्टि तिथि:
29 DEC 2020 3:51PM by PIB Mumbai
प्रवाशांच्या सुरक्षिततेला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण उपाय म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय गाडीचालकाच्या शेजारी बसलेल्या प्रवाशासाठी हवेची पिशवी (एअर बॅग) ठेवणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे. याची अंमलबजावणीकरिता नव्या माॅडेल्ससाठी 01 एप्रिल 2021 आणि सध्या अस्तित्वात असलेल्या माॅडेल्ससाठी 01 जून 2021 या तारखा प्रस्तावित आहेत.
मंत्रालयाच्या संकेतस्थळावर या संदर्भातील अधिसूचना क्रमांक GSR 797 (E) दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
यावरील सर्व सूचना/हरकती संबंधितांकडून ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून comments-morth[at]gov[dot]in या ईमेल पत्त्यावर 30 दिवसांच्या आत मागविण्यात येत आहेत.
S.Tupe/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1684369)
आगंतुक पटल : 250