उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतीं एम.वेंकैया नायडु यांनी माजी पंतप्रधान श्री. पी.व्ही.नरसिंहराव यांना वाहिली भावपूर्ण आदरांजली


उपराष्ट्रपतींनी श्री.नरसिंहराव यांच्यावर तेलगु भाषेत लिहिलेल्या पुस्तकाचे केले प्रकाशन

Posted On: 27 DEC 2020 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2020

 

भारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. वेंकैया नायडु यांनी माजी पंतप्रधान श्री. पी.व्ही.नरसिंहराव यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. ते म्हणाले की नरसिंह राव यांनी सुरु केलेल्या धाडसी आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली.

हैदराबाद मध्ये जेष्ठ पत्रकार ए.कृष्णा राव यांनी लिहिलेल्या ‘विप्लव तपस्वी:पी. व्ही.' या तेलगु भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करताना उपराष्ट्रपती म्हणाले की श्री. नरसिंहराव यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे स्विकारली त्यावेळी देश आर्थिक पेचप्रसंग आणि राजकीय अनिश्चिततेचा सामना करत होता.

मात्र श्री. राव यांनी राजकीय पंडितांच्या अपेक्षांना ओलांडून जात त्यांच्या कार्यकाळात अनेक आव्हानांचा सामना करत देशाला पुढे नेले.

उपराष्ट्रपती म्हणाले,"श्री.नरसिंहराव यांनी परवाना राज हटविले, बँकांच्या व्यवहारात सुधारणा घडवून आणल्या, विजेचे खाजगीकरण, दूरसंचार आधुनिकीकरण केले, निर्यातीला चालना दिली तसेच विदेशी गुंतवणूक आकर्षित केली अशा अनेक सुधारणा घडवून आणल्या.त्यांनी कृषीक्षेत्रात सुधारणा घडवून आणल्या आणि अन्नधान्याच्या वाहतूकीवरील निर्बंध काढले. त्यांनी जागतिक व्यापार संघटनेतील भारताचा प्रवेश सुकर केला.

माजी पंतप्रधानांनी 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सबलीकरण केल्याची आठवण यावेळी श्री. नायडू यांनी केली.


* * *

G.Chippalkatti/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1683995) Visitor Counter : 96