गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना जयंतीनिमित्त आदरांजली
परम आदरणीय भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींना जयंतीनिमित्त ‘सदैव अटल’ येथे वाहिली पुष्पांजली
"अटलजींचे विचार आणि देशाच्या विकासाप्रति त्यांचे समर्पण आपल्याला देशाची सेवा करण्याचे बळ नेहमीच पुरवत राहिल"
“विकास, गरीबांचे कल्याण आणि सुशासन यांच्या युगाचा पाया घालणाऱ्या आणि राष्ट्राला उभे आयुष्य समर्पित करणाऱ्या आदरणीय अटलबिहारी वाजपेयींना नमन”
अटलजींची कामाप्रति निष्ठा आणि देशसेवा आपल्याला नेहमीच ध्येयप्राप्तीसाठी प्रेरित करीत राहील
Posted On:
25 DEC 2020 3:52PM by PIB Mumbai
केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीना आज त्यांच्या जयंतीदिनी नवी दिल्ली येथील स्मारकावर जाउन आदरांजली वाहिली.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, परम आदरणीय भारतरत्न अटलजी यांच्या जयंतीनिमित्त ‘सदैव अटल’ या त्यांच्या स्मृतिस्थळी पुष्पांजली अर्पण केली. अटलजीचे विचार आणि देशाच्या विकासाप्रति त्यांचे समर्पण यामुळे आपणास सदैव देशसेवेची प्रेरणा मिळत राहील.
अमित शहा पुढे म्हणाले, "परम आदरणीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना नमन. त्यांनी विकासाचे तसेच गरीब कल्याण व भारतातील उत्तम प्रशासन युग सुरू केले. देशासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. अटलजींची कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवा आपल्याला सदैव प्रेरणा देत राहील. कामाप्रती निष्ठा आणि देशसेवा आपल्याला नेहमीच ध्येयप्राप्तीसाठी प्रेरित करतात.”
***
G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683593)
Visitor Counter : 174
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam