आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतात एकूण रुग्ण संख्येच्या 3% पेक्षा कमी सक्रीय रुग्ण, सक्रीय रुग्ण संख्येत घट जारी राखत ही संख्या 2.89 लाख


26 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात 10,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण

16 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी

Posted On: 23 DEC 2020 1:15PM by PIB Mumbai

 

भारताच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येत घट होण्याचा कल सुरुच आहे. देशात आज सक्रीय रुग्ण संख्या 2,89,240 आहे. एकूण पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत, सक्रीय रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होत ते  2.86% झाले आहे.

26 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात 10,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या, दैनंदिन रुग्ण संख्येपेक्षा जास्त असल्याने एकूण सक्रीय रुग्ण संख्येत घट होत आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0015GF1.jpg

गेल्या 24 तासात 23,950 जण पॉझिटीव्ह आढळले तर  याच काळात 26,895 जण कोरोनातून बरे झाले. गेल्या 24 तासात एकूण सक्रीय रुग्ण संख्येत 3,278 ची घट नोंदवण्यात आली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002FVAU.jpg

भारतात एकूण चाचण्यांची संख्या 16.5 कोटी  (16,42,68,721) झाली आहे. दर दिवशी दहा लाखापेक्षा जास्त चाचण्यांचे उद्दिष्ट राखत गेल्या 24 तासात 10,98,164 चाचण्या करण्यात आल्या. चाचण्या करण्याची देशाची प्रती दिवस क्षमता 15 लाख चाचण्याइतकी झाली आहे. 

चाचण्या करण्याच्या देशाच्या पायाभूत संरचनेला मोठी चालना मिळाली असून देशात आता 2,276  प्रयोगशाळा आहेत.

दररोज सुमारे 10 लाख चाचण्याहून अधिक होणाऱ्या चाचण्यामुळे पॉझिटीव्हिटी दर कमी राखण्याची निश्चिती झाली असून तो उतरता राहिला आहे.

भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे  1,19,035 चाचण्या करण्यात येत असून 23  राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात  या चाचण्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा  उत्तम आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003GRE3.jpg

16 राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004ACU4.jpg

चाचण्यांच्या पायाभूत क्षमतांचा विस्तार केल्याने ज्या राज्ये/ केंद्र शासित प्रदेशाचा पॉझिटीव्हिटी दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे अशा राज्यातही पॉझिटीव्हिटी दरात घट  नोंदवण्यात येत आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005LICE.jpg

एकूण बरे झालेल्यांची संख्या 9,663,382 झाली असून बरे होण्याच्या दरात वाढ होऊन तो 95.69% झाला आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0069LGU.jpg

बरे झालेल्यांपैकी 75.87%  रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे   5,057  रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 4,122 आणि पश्चिम बंगाल मध्ये 2,270 जण बरे झाले.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007JJAX.jpg

नव्या रुग्णांपैकी 77.34% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 6,049 कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 3,106 रुग्णांची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image008SM80.jpg

गेल्या 24 तासात 333 मृत्यूंची नोंद झाली.

या पैकी सुमारे 75.38% मृत्यू 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.

महाराष्ट्रात  सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन 75 मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये 38 आणि केरळ मध्ये 27  मृत्यूंची नोंद झाली.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0091QZL.jpg

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1682909) Visitor Counter : 172