सांस्कृतिक मंत्रालय

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने त्यांच्या केंद्रीय संरक्षित स्मारक/स्थानांच्या प्रवेशसंख्येवरील मर्यादा शिथील केली


ध्वनी आणि प्रकाश योजनेवर आधारीत शो पुन्हा सुरू

Posted On: 20 DEC 2020 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2020

 

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (ASI) आपल्या संरक्षित स्मारक/स्थानांच्या प्रवेशसंख्येवरील मर्यादा शिथील केली आहे. प्रादेशिक संचालक आणि पुरातत्व अधीक्षक यांना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी नव्याने जारी करून पाठविलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही माहिती देण्यात येत आहे.

तथापि, दररोज अनुमती देण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या,संबंधित पुरातत्व अधीक्षक, संबंधित जिल्हाधिकारी जे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देखील असतात त्यांच्या अनुमतीने ठरवू शकतील.

मार्गदर्शिकेत पुढे असे नमूद करण्यात आले आहे, की क्यूआर कोड आणि नेटवर्क यामध्ये जेथे समस्या येत असतील, तेथे तिकीट विक्री प्रत्यक्ष (भौतिक) रित्या करता येईल. ध्वनी आणि प्रकाश योजनेवर आधारीत शो पुन्हा सुरू करता येतील.

इतर सर्व तरतुदी या दिनांक 2.7.2020 (6.7.2020 च्या पूर्वलक्षी प्रभावानुसार) यात दिलेल्या एसओपीनुसार पुढील आदेश येईपर्यंत लागू असतील.

सर्व केंद्रीय संरक्षित स्मारकांच्या आणि स्थानांच्या ठिकाणी गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाने तसेच राज्य आणि/अथवा जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या कोविड संबंधित शिष्टाचारांचे पालन करणे बंधनकारक राहील.

 

* * *

S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1682173) Visitor Counter : 179