युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

फिट इंडिया सायक्लेथाॅनच्या पहिल्या सप्ताहात सुमारे 13 लाख लोकांचा सहभाग


सायक्लेथाॅन येत्या 31डिसेंबर पर्यंत सुरू रहाणार, फिट इंडिया संकेतस्थळावर सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी

Posted On: 20 DEC 2020 1:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2020


दुसऱ्या फिट इंडिया सायक्लेथाॅनला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय क्रीडामंत्री श्री. किरेन रिजिजू यांनी नुकताच या उपक्रमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आरंभ केला. या  भव्य सायकलींग उपक्रमाचा आरंभ 7 डिसेंबर 2020 रोजी झाला,आणि तेव्हापासून देशभरातील नागरीक यात सहभागी होत आहेत. 15 डिसेंबर 2020 पर्यंत 12,69,695 लोक यात सहभागी झाले होते आणि त्यांनी 57,51,874 किलोमीटर अंतर सायकलवरून  पार केले गेले. फिट इंडिया सायक्लेथाॅनला सोशल मीडियावरूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.सामान्य नागरीकांसह अनेक प्रसिद्ध व्यक्ती देखील आपले सायकलिंग करत असलेले फोटोज आणि व्हिडीओज सोशल माध्यमांवर पोस्ट करत आहेत.

हा उपक्रम येत्या 31 डिसेंबर 2020 पर्यंत सुरू रहाणार आहे. नागरिकांनी सहभागी होण्यासाठी फिट इंडिया वेबसाइटवर नोंदणी करावी (https://fitindia.gov.in/fit-india-cyclothon-2020/) आणि दररोज त्यांना जमेल तेवढे अंतर  सायकलवरुन कापावे आणि त्यांच्या प्रतिमा आणि व्हिडीओज @FitIndiaOff ला टॅग करून सोशल मिडियावर सामायिक कराव्यात. यासाठी #FitIndiaCyclothon आणि  #NewIndiaFitIndia हॅशटॅग वापरावेत.

 

या  विशाल  उपक्रमात नागरीकांना सहभागी होण्याचे आवाहन करत श्री.  रिजीजू यांनी असे ट्वीट केले आहे, की सायकलिंग हा तंदुरुस्त रहाण्यासाठी उत्तम मार्ग आहे आणि त्यामुळे कार्बनचे अस्तित्व (पदचिन्ह) कमी होते.

 

या उपक्रमाचा शुभारंभ जानेवारी 2020 मधे क्रीडामंत्र्यांनी गोव्यातील पणजी येथे केला होता. लोकांनी मैदानी खेळांत सामील व्हावे आणि देशभरात सायकलिंग संस्कृती रुजावी या उद्देशाने हा उपक्रम  सुरू केला होता. या उपक्रमात देशभरातील 35 लाख सायकलस्वारांनी सहभाग घेतला.

 

* * *

M.Chopade/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1682153) Visitor Counter : 171