रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

ई20 इंधनाच्या स्वीकारासाठी वाहतूक मंत्रालयाने जनतेकडून मागवल्या सूचना

Posted On: 18 DEC 2020 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2020

 

ई20 इंधन म्हणजेच गॅसोलीनमध्ये 20% इथेनॉलच्या मिश्रणाचा  वाहन इंधन म्हणून स्वीकार करण्यासाठी आणि या इंधनासाठी सामुहिक उत्सर्जन निकषांचा अंगीकार करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 11 डिसेंबर 2020 ला जीएसआर 757 (ई) हा अधिसूचना मसुदा प्रकाशित करून जनतेकडून सूचना मागवल्या आहेत.  यामध्ये ई20 अनुरूप वाहनांच्या विकासाला सुविधा देण्यात आल्या आहेत. कार्बनडायऑक्साईड, हायड्रोकार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीही याची मदत होणार आहे. तेलआयातीवरचा खर्च कमी होण्यासाठी मदत होणार असून त्यातून परकीय चलनाची बचत होण्याबरोबरच  उर्जा सुरक्षिततेला चालना मिळणार आहे. 

गॅसोलीन आणि  इथेनॉलच्या मिश्रणात इथेनॉलच्या टक्केवारीसाठी वाहनाची अनुरूपता, वाहन निर्मात्याकडून स्पष्ट करण्यात येणार असून वाहनावर स्पष्ट दिसेल अशा स्टिकरवर ते दर्शवण्यात येईल. 


* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1681791) Visitor Counter : 15