वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पियूष गोयल यांनी परदेशी गुंतवणूकदारांना भारताच्या विकासात सहभागी होण्यासाठी केले आमंत्रित


जगातील सर्वात सुविधाजनक एफडीआय धोरणांपैकी एक भारताकडे आहे

Posted On: 15 DEC 2020 6:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2020

 

रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पियूष गोयल यांनी परदेशी गुंतवणूकदारांना भारताच्या विकास गाथेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. सीआयआयच्या भागीदारी परिषद 2020 च्या उद्घाटन सत्राला आभासी माध्यमातून संबोधित करताना त्यांनी परदेशी गुंतवणूकदारांचे मन:पूर्वक स्वागत केले आणि संधीच्या या देशात गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना संपूर्ण सहकार्य, भागीदारी आणि सहभागाचे आश्वासन दिले.

मंत्री म्हणाले की खुल्या मार्गावर चालत असताना भारत आपल्या अर्थव्यवस्थेचे नवीन क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांना योग्यपद्धतीने खुले करून देत आहे आणि विविध गुंतवणूकदार भागीदारांसह धोरणात्मक संबंधांद्वारे व्यवसायांना प्रोत्साहित करत असून, भविष्यासाठी आमची आर्थिक योजना बळकट करत आहोत. ते म्हणाले की, भारतात थेट परदेशी गुंतवणूकीचा प्रवाह निरंतर वृद्धिंगत होत आहे. “या वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत, जेंव्हा कोविड-19 महामारीचा उद्रेक संपूर्ण देशभरात झाला होता तेंव्हा देखील, आपली थेट परदेशी गुंतवणूक वाढली आहे. जगातील सर्वात सोयीस्कर एफडीआय धोरणांपैकी एक भारताकडे आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत एफडीआयचा प्रवाह 40 अब्ज डॉलर्स इतका होता जो मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 13 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी आम्ही जगातील सर्वात आकर्षक कर दरांची घोषणा केली आहे. भारतातील व्यवसायांसाठी 22% कर आणि ऑक्टोबर 2019 नंतर स्थापन झालेल्या नवीन उद्योगांसाठी 15% कर लागू करण्यात आला आहे. ”

गोयल म्हणाले, उद्योगांना भारतात येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी उत्पादन-दुवा साधणाऱ्या (प्रॉडक्शन लिंक्ड) प्रोत्साहन योजनेसह अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत. “सर्व मंत्रालयांमध्ये गुंतवणूक कक्ष स्थापन केले आहेत. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच केंद्र सरकार आणि राज्ये एकत्रितपणे  गुंतवणूकीला आकर्षित  आणि प्रोत्साहित करण्यासाठी कार्यरत आहेत, अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आणि उत्पादकता पातळी वाढविण्याच्या उद्देशाने भारत अनेक सुधारणांची वेगाने घोषणा करीत आहे. आमच्या व्ही-आकाराच्या पुनर्लाभात अधिकाधिक जागतिक सहभागाला प्रोत्साहित करण्यासाठी भारत अनुकूल सुधारणांचा आणि सोयीस्कर उपायांची सुरुवात करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जनतेसाठी तयार केलेल्या विकास, प्रगती आणि समृद्धीच्या वाहनामध्ये चढण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करतो. ”

आयुष्य, उपजीविका आणि विकासासाठी भागीदारी या भागीदारी परिषदेच्या विषयाला अनुसुरून गोयल म्हणाले की यामुळे अर्थव्यवस्थेला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी आणि नवीन संधींना प्रोत्साहित करण्यासाठी आपण सर्व करत असलेल्या संयुक्त प्रयत्नात मदत होईल. “आमचे उद्दीष्ट केवळ सर्वोच्च  पातळीवर शाश्वत राहण्याचे नाही तर 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे लक्ष्य आम्हाला गाठायचे आहे. विविध क्षेत्रांमधील ऐतिहासिक सुधारणांमुळे लोकांच्या समृद्धीची पातळी सुधारण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे देशाला देखील एक उत्तम स्थान प्राप्त होईल. आम्हाला विश्वास आहे की नवीन जगात नवीन विचार असतील, विकासासाठी नवीन संधी असतील. एकटे, आम्ही फार थोडे साध्य करू शकतो परंतु एकत्रितपणे आमची झेप कल्पनेपलीकडील  असू शकते. ही वेळ भारताची आहे, आपली उपस्थिती आणि भारतामध्ये गुंतवणूक वाढविण्याची हीच वेळ आहे. भारत हा संधींचा देश आहे. ”


* * *

S.Thakur/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680833) Visitor Counter : 193