अल्पसंख्यांक मंत्रालय

कोरोना महामारीच्या काळात, देशात जनजागृती आणि प्रभावी संदेश देण्यात लघुचित्रपटांची भूमिका महत्वाची : मुख्तार अब्बास नक्वी


नवी दिल्लीत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय कोरोना विषाणू लघुचित्रपट’ महोत्सवात मुख्तार अब्बास नक्वी यांचे भाषण

प्रविष्टि तिथि: 14 DEC 2020 4:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2020


कोरोना महामारीच्या काळात, सरकार, समाज, चित्रपट आणि प्रसारमाध्यमे यांनी धैर्य, कटिबद्धता आणि सावधानतेने, जनजागृती करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली, असे प्रतिपादन, केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. या काळात, जनजागृती करणाऱ्या आणि प्रभावी  संदेश देणाऱ्या लघुपटांचे योगदान उल्लेखनीय ठरले, असेही नक्वी म्हणाले.  

नवी दिल्लीत एनडीएमसी संमेलन केंद्रात आयोजित ‘आंतरराष्ट्रीय कोरोना विषाणू लघुपट महोत्सवा’त ते आज बोलत होते. कोरोनाची आव्हाने आणि त्यापासून बचावासाठी घ्यायची काळजी याबाबत लघुपटांच्या माध्यमातून अत्यंत परिणामकारकरित्या लोकांमध्ये संदेश दिले गेले, ज्यातून मोठी जनजागृती झाली, असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, विविध देशांचे राजदूत, पत्रकार, बुद्धीजीवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1680560) आगंतुक पटल : 272
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Tamil , Telugu