पंतप्रधान कार्यालय

हवामान महत्वाकांक्षा शिखर परिषदेतील पंतप्रधानांच्या संदेशाचा मजकूर

Posted On: 12 DEC 2020 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2020

 

 

महामहीम,

ही शिखर परिषद हवामान बदलाविरूद्धच्या आमच्या लढ्यातील सर्वात महत्वाकांक्षी पाऊल असलेल्या पॅरिस कराराच्या पाचव्या वर्धापन दिनाचे प्रतिक आहे. आज आपण आपली दृष्टी आणखी उंचावण्याचा विचार करत असताना आपण आपल्या भूतकाळाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण केवळ आपल्या महत्वाकांक्षामध्ये बदल केले पाहिजेत इतकेच नाही तर आधीच निश्चित केलेल्या लक्ष्यांविरूद्धच्या आपल्या यशाचे पुनरावलोकन देखील केले पाहिजे. तरच आपला आवाज भविष्यातील पिढ्यांसाठी विश्वासार्ह बनू शकेल.

महामहीम,

मी आपल्याला हे नम्रपणे सांगू इच्छितो की भारत केवळ पॅरिस कराराच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या दृष्टीनेच मार्गक्रमण करत नाही तर अपेक्षांच्या पलीकडे जाऊन कार्य करत आहे. आम्ही उत्सर्जनाची तीव्रता 2005 च्या पातळीपेक्षा  21% कमी केली आहे. आमची सौर क्षमता 2014 मधील 2.63 गीगा वॅट्स वरून 2020 मध्ये 36 गीगा वॅट्सपर्यंत वाढली आहे. आमची नवीकरणीय ऊर्जा क्षमता जगातील चौथ्या क्रमांकाची आहे.

2022 पूर्वी हे 175 गीगा वॅट्सपर्यंत पोहोचेल. आणि, आमच्याकडे आता 2030 पर्यंत नवीकरणीय उर्जा क्षमतेचे 450 गीगा वॅट्सचे आणखी महत्त्वाकांक्षी लक्ष्य आहे. आम्ही यशस्वीरीत्या आमच्या वन संरक्षणाचा विस्तार आणि जैवविविधतेचे रक्षण केले आहे. आणि जागतिक व्यासपीठावर भारताने दोन प्रमुख उपक्रम राबविले आहेत:

  • आंतरराष्ट्रीय सौर युति आणि
  • आपत्ती निवारण पायाभूत सुविधेसाठी युति

 

महामहीम,

2047 मध्ये, भारत एक आधुनिक, स्वतंत्र राष्ट्र म्हणून 100 वर्षे साजरे करेल. या ग्रहावरील माझ्या सर्व सहकाऱ्यांना आज मी एक वचन देतो. शताब्दी वर्ष साजरा करणारा भारत केवळ स्वत:ची लक्ष्ये साध्य करणार नाही तर आपल्या सर्वांच्या अपेक्षांची देखील पूर्तता करेल.

धन्यवाद!

 

* * *

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680309) Visitor Counter : 311