अर्थ मंत्रालय

"राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य" या राज्याच्या भांडवली खर्चाच्या सहाय्यासाठीच्या योजनेचा 27 राज्यांना लाभ


एकूण 10,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या योजनांना मंजूरी

Posted On: 12 DEC 2020 2:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 डिसेंबर 2020

 

‘राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य’ या योजनेचा लाभ तामिळनाडू वगळता इतर सर्व राज्यांना मिळेल. ही योजना अर्थमंत्र्यांनी आत्मनिर्भर पॅकेजचा भाग म्हणून 12 ऑक्टोबर 2020 ला जाहीर केली होती.

कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यांना कर महसूलात येत असलेल्या तुटीमुळे या आर्थिक वर्षात कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल हे लक्षात घेऊन राज्यांच्या भांडवली खर्चात हातभार लावण्यासाठी ही योजना आहे.

भांडवली खर्चाचा परिणाम गुणाकार श्रेणीत होतो, त्यामुळे अर्थव्यवस्थेची भविष्यातील उत्पादन क्षमता वाढेल आणि परिणामी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दरही वाढेल. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारची बिकट आर्थिक परिस्थिती असूनही भांडवली राज्यांच्या खर्चाच्या संदर्भात राज्यांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य’ या योजनेला 2020-21 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील म्हणजेच आरोग्य, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, जलसंधारण, ऊर्जा, वाहतूक, शिक्षण, शहरी विकास अशा अनेक क्षेत्रातील भांडवली खर्चाच्या योजनांना मंजूरी देण्यात आली आहे.

राज्यांकडून या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. अर्थखात्याकडून आतापर्यंत 27 राज्यांच्या एकूण 9,879.61 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चास मंजूरी दिली गेली. या योजने अंतर्गत पहिला हप्ता म्हणून 4,939.81 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत राज्यांना दिला गेला आहे. राज्यनिहाय मंजूर केलेला निधी आणि प्रदान केलेला निधी याचा तपशील खालीलप्रमाणे.

 

 

Scheme for Special Assistance to States for Capital Expenditure

(Rs. in crore)

S.No

State

Amount Allocated

Amount Approved

Amount Released

1

Andhra Pradesh

344.00

344.00

172.00

2

Arunachal Pradesh

200.00

200.00

100.00

3

Assam

450.00

450.00

225.00

4

Bihar

843.00

843.00

421.50

5

Chhattisgarh

286.00

286.00

143.00

6

Goa

32.00

32.00

16.00

7

Gujarat

285.00

285.00

142.50

8

Haryana

91.00

91.00

45.50

9

Himachal Pradesh

450.00

450.00

225.00

10

Jharkhand

277.00

277.00

138.50

11

Karnataka

305.00

305.00

152.50

12

Kerala

163.00

163.00

81.50

13

Madhya Pradesh

660.00

660.00

330.00

14

Maharashtra

514.00

514.00

257.00

15

Manipur

200.00

200.00

100.00

16

Meghalaya

200.00

200.00

100.00

17

Mizoram

200.00

200.00

100.00

18

Nagaland

200.00

200.00

100.00

19

Odisha

388.00

388.00

194.00

20

Punjab

150.00

146.50

73.25

21

Rajasthan

501.00

501.00

250.50

22

Sikkim

200.00

200.00

100.00

23

Tamil Nadu

351.00

0.00

0.00

24

Telangana

179.00

179.00

89.50

25

Tripura

200.00

200.00

100.00

26

Uttar Pradesh

1501.00

1501.00

750.50

27

Uttarakhand

450.00

434.11

217.06

28

West Bengal

630.00

630.00

315.00

 

Total

10250.00

9879.61

4939.81


* * *

S.Thakur/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1680200) Visitor Counter : 192