PIB Headquarters

पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र

Posted On: 09 DEC 2020 6:28PM by PIB Mumbai

Coat of arms of India PNG images free download 

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्‍या आणि सत्‍यता पडताळणी बातम्‍या समाविष्‍ट)

#Unite2FightCorona

#IndiaFightsCorona

Image

Image

Image

Image

दिल्ली-मुंबई, 9 डिसेंबर 2020

 

सार्वजनिक डेटा कार्यालय संकलक कंपन्यांना विना परवाना शुल्क सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क स्थापन करुन वाय-फाय सेवा प्रदान करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत दूरसंचार विभागाच्या सार्वजनिक डेटा कार्यालय संकलक कंपन्यांना (PDOAs) सार्वजनिक डेटा कार्यालयामार्फत (PDOs) सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कच्या माध्यमातून देशात ब्रॉडबँड सेवा विस्ताराच्या दृष्टीकोनातून सार्वजनिक वाय-फाय सेवा देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. या सार्वजनिक वाय-फाय नेटवर्कद्वारे ब्रॉडबँड इंटरनेट प्रदान करण्यासाठी कोणताही परवाना शुल्क असणार नाही.

पंतप्रधानांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी संसदेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी सोहळा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी संसद मार्ग येथील संसदेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी सोहळा होणार आहे. नवीन इमारतीची उभारणी “आत्मनिर्भर भारत” धोरणाचा भाग आहे आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच जनतेची संसद उभारण्याची महत्त्वाची संधी आहे. नवीन इमारत 2022 मध्ये तयार होईल आणि स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनी ‘न्यू इंडिया’ च्या गरजा आणि आकांक्षांशी जुळणारी असेल.

 

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :

देशात सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत 3.78 लाखांपेक्षा खाली, एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 4% हून कमी

भारतात सक्रीय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत रहाण्याचा कल कायम राहिला आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 3,78,909 इतकी आहे. एकूण पाॅझिटीव्ह रुग्णांपैकी सक्रीय रुग्णांची संख्या ही आणखी कमी होऊन तो दर आता 3.89% इतका झाला आहे.

दररोज उपचारांनंतर बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने, सक्रीय रुग्णसंख्या कमी झाल्याचे सुनिश्चित झाले आहे. गेल्या 24 तासांत सक्रीय रुग्णसंख्या एकूण 4,957 ने कमी झाली आहे.

महाराष्ट्रात एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येची नोंद झाली असून 6,365 रुग्ण नव्याने बरे झाले आहेत.गेल्या 24 तासांत केरळमध्ये 4,735 रुग्ण बरे झाले असून त्यापाठोपाठ दिल्लीत 3,307 रुग्ण बरे झाले आहेत.

 

इतर अपडेट्स:

  • एकात्मिक औषध विभाग स्थापन करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि एम्स एकत्रित कार्य करणार- आयुष मंत्रालय आणि एम्स म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने एकात्मिक औषध विभाग स्थापन करण्यासाठी एकत्रित कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकात्मिक औषध विभागाच्या निर्मितीसाठी आयुष मंत्रालय सीआयएमआरला पाठिंबा देणार असल्याची माहिती यावेळी आयुष मंत्रालयाच्या सचिवांनी दिली. कोविड-19 काळामध्ये सार्वजनिक आरोग्याला झालेले लाभ लक्षात घेऊन, संयुक्त औषधोपचाराची नितांत गरज असल्याचे दिसून आले आहे.

  • सुधारणांवर आधारित कर्जाला मंजुरी मिळाल्यामुळे राज्यांमध्ये विविध नागरिककेंद्री सुधारणांना चालना- कोविड–19 महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत आर्थिक स्रोतांच्या सुलभ उपलब्धतेसाठी भारत सरकारने विविध उपाययोजनांच्या माध्यमातून राज्यांना पाठबळ मिळवून दिले. यामध्ये राज्यांच्या जीएसडीपी अर्थात स्थूल राज्यांतर्गत उत्पन्नाच्या 2% निधीच्या अतिरिक्त कर्जाला परवानगी देण्यात आली. यामुळे राज्यांना महामारीशी लढा देण्यासाठी आणि जनतेला दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचा दर्जा कायम राखण्यासाठी आवश्यक असलेली अतिरिक्त आर्थिक साधने वापरता आली.

  • भारत आणि सुरीनाम यांच्यामध्ये आरोग्य आणि औषध क्षेत्रात सहकार्याच्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता- भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि सुरीनाम प्रजासत्ताकचे आरोग्य मंत्रालय यांच्यामध्ये झालेल्या या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढीस प्रोत्साहन मिळू शकणार आहे. भारत आणि सुरीनाम यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या व्दिपक्षीय सामंजस्य करारामुळे आरोग्य आणि औषध क्षेत्रामध्ये परस्पर संशोधनाला प्रोत्साहन देऊन आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या दिशेने कार्य करणे शक्य होणार आहे.

 

महाराष्ट्र अपडेट्स:

औरंगाबाद येथील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळे उद्यापासून पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित पर्यटक स्थळांवर गाईड, दुकानदार, स्थानिक कारागीर, हॉटेल व्यावसायिक आणि वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी कोविड चाचणी घेण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मुंबई येथील नवीन रुग्णसंख्या अजूनही एक हजारापेक्षा कमी आहे. मंगळवारी 585 नवीन रुग्ण, 565 जण बरे झालेले आणि 7 मृत्यूची नोंद झाली. पुणे विभागात याच दिवशी 749 नवीन रुग्ण आणि 20 मृत्यूची नोंद झाली.

 

FACT CHECK

Image

Image

* * *

M.Chopade/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1679454) Visitor Counter : 286