पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी संसदेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी सोहळा

Posted On: 08 DEC 2020 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबर 2020 रोजी संसद मार्ग येथील संसदेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी सोहळा होणार आहे. नवीन इमारतीची उभारणी “आत्मनिर्भर भारत” धोरणाचा भाग आहे आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच जनतेची संसद उभारण्याची महत्त्वाची संधी आहे. नवीन इमारत 2022 मध्ये तयार होईल आणि स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापनदिनी ‘न्यू इंडिया’च्या गरजा आणि आकांक्षांशी जुळणारी असेल.

नवीन संसदीय इमारत ही आधुनिक, अत्याधुनिक आणि ऊर्जा पूरक असेल, ती गैर-व्यत्ययात्मक सुरक्षा सुविधांनी युक्त असेल आणि त्रिकोणी आकाराची इमारत असेल, जी सध्याच्या संसदेच्या जवळच आहे. लोकसभा सध्याच्या आकारापेक्षा तीन पटीने मोठी असेल आणि राज्यसभासुद्धा तशीच मोठी असणार आहे. नवीन इमारतीचा अंतर्गत भाग भारतीय संस्कृतीचे समृद्ध मिश्रण आणि आपल्या प्रादेशिक कला, हस्तकला, वस्त्र आणि वास्तुकलेच्या विविधतेचे प्रदर्शन करणारे असेल. इमारत रचनेत भव्य केंद्रीय घटनात्मक गॅलरीसाठी जागा समाविष्ट आहे, जी नागरिकांसाठी प्रवेशयोग्य असेल. नवीन संसद भवनाचे बांधकाम सक्षम हरित तंत्रज्ञानाचा उपयोग, पर्यावरण अनुकूल पद्धतींचा प्रचार करेल, रोजगाराच्या संधी निर्माण करेल आणि आर्थिक पुनरुज्जीवनासाठी हातभार लावेल. यात उच्च प्रतीची ध्वनी आणि दृकश्राव्य सुविधा, सुधारित आणि आरामदायक आसन व्यवस्था, आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याच्या प्रभावी आणि समावेशी तरतुदी असतील. इमारतीसाठी भूंकपप्रवण क्षेत्र 5 च्या आवश्यकतांचे पालन करण्यासह सर्वोच्च संरचनात्मक सुरक्षा मानदंडांचे पालन करण्यात येईल आणि देखभाल आणि संचालन सुलभ करण्याच्या दृष्टीने आखणी केलेली आहे.

पायाभरणी सोहळ्यासाठी लोकसभा सभापती ओम बिर्ला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंह पुरी, राज्यसभेचे उपसभापती हरीवंश नारायण सिंग यांची उपस्थिती असणार आहे. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, सचिव, राजदूत/उच्चायुक्त अशा सुमारे 200 मान्यवरांची कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे, सोहळ्याचे थेट वेबकास्ट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

 

S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1679224) Visitor Counter : 232