पंतप्रधान कार्यालय
बुरेवी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केरळमधल्या परिस्थितीबाबत पंतप्रधानांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
Posted On:
02 DEC 2020 10:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुरेवी चक्रीवादळामुळे केरळमध्ये उदभवलेल्या परिस्थितीबद्दल केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्याशी संवाद साधला.
ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “बुरेवी चक्रीवादळामुळे राज्यातील परिस्थितीविषयी केरळचे मुख्यमंत्री @vijayanpinarayi यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो. केंद्र सरकारकडून केरळला शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चक्रीवादळ प्रभावित भागात राहणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो.”
Jaydevi P.S./S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1677830)
Visitor Counter : 114
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam