पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 30 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देतील आणि राष्ट्रीय महामार्ग -19 च्या वाराणसी-प्रयागराज दरम्यान सहा -पदरी रुंदीकरण प्रकल्पाचे उद्घाटन करतील
पंतप्रधान देव दीपावलीला उपस्थित राहतील आणि श्री काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पालाही भेट देतील
Posted On:
28 NOV 2020 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 28 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर 2020 रोजी वाराणसीला भेट देतील आणि राष्ट्रीय महामार्ग -19 च्या हंडिया (प्रयागराज) - राजातालाब (वाराणसी) या मार्गाचा सहा पदरी रुंदीकरण प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान देव दीपावलीला उपस्थित राहतील आणि श्री काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पालाही भेट देतील आणि सारनाथ पुरातत्व स्थळालाही भेट देतील.
राष्ट्रीय महामार्ग -19 वर 2447 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या 73 कि.मी. च्या या नवीन रुंद आणि सहा पदरी मार्गामुळे प्रयागराज ते वाराणसी दरम्यान प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होण्याची अपेक्षा आहे.
वाराणसीत प्रकाश आणि उत्साहाचा जगप्रसिद्ध उत्सव बनलेला देव दीपावली कार्तिक महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला साजरा केला जातो. वाराणसीच्या राज घाटावर दीप प्रज्वलन करून पंतप्रधान महोत्सवाची सुरूवात करतील आणि त्यानंतर गंगा नदीच्या दोन्ही बाजूंना 11 लाख दिवे लावले जातील.
या भेटीदरम्यान पंतप्रधान बांधकाम सुरू असलेल्या काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाला भेट देऊन तिथल्या प्रगतीचा आढावा घेतील. पंतप्रधान सारनाथच्या पुरातत्व ठिकाणी प्रकाश आणि ध्वनी शो देखील पाहतील ज्याचे त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला उद्घाटन केले होते.
R.Tidke/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676968)
Visitor Counter : 191
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam