पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे भेट दिली
Posted On:
28 NOV 2020 8:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला आज भेट दिली आणि संस्थेतील लस उत्पादनाशी संबंधित लोकांच्या गटाबरोबर संवाद साधला. लस उत्पादना संदर्भात त्यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या प्रगतीविषयी तपशील सांगितला,तसेच लसीच्या वितरणासंदर्भात कशी योजना आखली आहे याविषयी माहिती दिली.
"सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे संबंधितांशी चांगला संवाद झाला. लस उत्पादना संदर्भात त्यांनी आतापर्यंत कशी प्रगती केली आहे याविषयी सांगितले तसेच लस उत्पादन आणखी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी काय आराखडा आहे त्याचीही त्यांनी माहिती दिली. तसेच त्यांच्या लस उत्पादन केंद्राची पाहणीही केली." असे पंतप्रधान ट्विटमध्ये म्हणाले.
Jaydevi PS/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676828)
Visitor Counter : 153
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam