आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तरप्रदेश या राज्यांना कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी केंद्राच्या उच्चस्तरीय समितीची भेट
सक्रीय रुग्णांचा दर घसरून, एकूण रुग्णसंख्येच्या 4.85%
Posted On:
22 NOV 2020 1:34PM by PIB Mumbai
हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील कोविड प्रतिसाद आणि व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी,केंद्रसरकारने उच्चस्तरीय समिती, नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्यातील सक्रीय रूग्णांच्या संख्येत वाढ झालेली नोंदविली गेली आहे, म्हणजेच जे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत अथवा वैद्यकीय देखरेखीखाली घरात विलगीकरणात आहेत, त्यांची संख्या वाढत असल्याचे दर्शवित आहे.
ही तीन सदस्यांची समिती, ज्या जिल्ह्यांत रुग्णसंख्या वाढत आहे अशा ठिकाणांचा दौरा करेल आणि त्या राज्यातील प्रतिबंधात्मक प्रयत्नांचे सबलीकरण, सर्वेक्षण लक्ष, चाचण्या,जंतुसंसर्ग दूर करण्यासाठी तसेच नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना आणि पाॅझिटीव्ह रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतील. ही समिती वेळेवर निदान करण्याच्या व्यवस्थापनातील आव्हाने आणि पाठपुरावा यावर कार्यक्षमतेने मार्गदर्शन करेल.
भारतात सध्या सक्रीय रूग्णांची संख्या (4,40,962) कमी होत असून सक्रीय रुग्ण आणि एकूण पाॅझिटीव्ह रूग्णसंख्या यांचा दर आणखी कमी होऊन तो 4.85%वर आला असून सतत 5%पेक्षा खालीच कायम राहिला आहे.
बरे झालेले रुग्ण आणि उपचार घेत असलेले रुग्ण यांच्यातील अंतर सतत वाढत आहे आणि ते 80,80,655 इतके आहे.
26 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आजपर्यंत 20,000 पेक्षा कमी रुग्ण आहेत.
7 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात सक्रीय रुग्णांची संख्या 20,000 ते 50,000 दरम्यान आहे, तर महाराष्ट्र आणि केरळमध्ये 50,000 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
दिल्लीत 6,963 रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत.केरळ आणि महाराष्ट्रात अनुक्रमे 6,719 आणि 4,088 रूग्ण नव्याने बरे झाल्याची नोंद झाली आहे.
नवीन रूग्णसंख्येत दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा वाटा 76.81% इतका आहे. गेल्या 24 तासांत 45,209 रुग्णांना नव्याने कोविडचा संसर्ग झाला आहे.
दिल्लीत गेल्या 24 तासांत 5,879 रुग्ण नव्याने आढळून आले. केरळमध्ये 5,772 आणि महाराष्ट्रात 5,760 दररोजच्या नव्या रुग्णांची काल नोंद झाली.
501 पैकी 76.45% रूग्ण गेल्या 24 तासांत मृत्युमुखी पडले असून ते दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.
दिल्लीत 111 रुग्ण मृत्युमुखी पडले असून त्यांचे प्रमाण 22.16% इतके आहे. महाराष्ट्रात 62 तर पश्चिम बंगालमध्ये 53 मृत्यूंची नोंद झाली.
M.Chopade/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674857)
Visitor Counter : 171
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam