पंतप्रधान कार्यालय

जी-20 नेत्यांची 15 वी शिखर परिषद

Posted On: 21 NOV 2020 11:35PM by PIB Mumbai

 

सौदी अरेबियाने 21-22 नोव्हेंबर  2020 रोजी बोलावलेल्या 15 व्या जी-20 शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.  कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर  19  सदस्य देश , युरोपीय संघ,   इतर आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख नेते या व्हर्चुअल परिषदेत सहभागी झाले होते.

2. कोविड 19 महामारीमुळे आव्हाने आणि अडचणी उद्भवूनही यावर्षी जी -20 चे अध्यक्षपद यशस्वीपणे भूषवल्याबद्दल आणि दुसरी जी -20 शिखर परिषद व्हर्चुअल स्वरूपात आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांनी सौदी अरेबियाचे आणि त्याच्या नेतृत्वाचे अभिनंदन केले.

3. सध्याच्या कोविड19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वांसाठी एकविसाव्या शतकाच्या संधी साकारणेया संकल्पनेवर आधारित सौदीच्या अध्यक्षतेखालील शिखर परिषदेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महामारीवर मात, अर्थव्यवस्थेला पुन्हा भरारी देणे , रोजगार पूर्ववत  करणे आणि सर्वसमावेशक,शाश्वत आणि लवचिक भविष्य घडवण्यावर या परिषदेचा कार्यक्रम केंद्रित होता.  दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत महामारी सज्जता आणि वसुंधरेच्या संरक्षणाविषयी अन्य कार्यक्रमांचे देखील नियोजन करण्यात आले आहे.

4. पंतप्रधानांनी कोविड -19 महामारी ही मानवतेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण वळण आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगितले.  त्यांनी जी -20 देशाना निर्णायक कृतीचे आवाहन केले जे केवळ आर्थिक भरारी , रोजगार आणि  व्यापारापुरती मर्यादित असू नये तर वसुंधरेचे संवर्धन करण्यावरही केंद्रित असायला हवे असे सांगून आपण सर्व मानवतेच्या  भविष्याचे विश्वस्त असल्याचे नमूद केले.

5. पंतप्रधानांनी कोरोना नंतरच्या जगासाठी नवीन जागतिक सूचकांकाचा प्रस्ताव मांडला ज्यात प्रतिभावंतांची मोठी साखळी तयार करणेसमाजातील सर्व घटकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोच  सुनिश्चित करणे; प्रशासन यंत्रणेत  पारदर्शकता; आणि  विश्वस्त या भावनेने वसुंधरेचे संवर्धन हे चार मुख्य घटक आहेत  याच्या आधारे  जी -20 नवीन जगाची पायाभरणी करू शकेल.

6.  पंतप्रधानांनी अधोरेखित केले की गेल्या काही दशकांत, भांडवल आणि वित्तपुरवठा यावर भर  देण्यात आला आहे, परंतु प्रतिभावंतांची मोठी साखळी तयार करण्यासाठी बहुआयामी कौशल्य  यावर  लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. यामुळे केवळ नागरिकांची प्रतिष्ठाच वाढणार  नाही तर संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या नागरिकांना अधिक लवचिक बनवेल. ते म्हणाले की नवीन तंत्रज्ञानाचे कोणतेही मूल्यांकन जीवन सुलभता आणि जीवनाची गुणवत्ता यावर होणाऱ्या परिणामावर आधारित असले पाहिजे.

7. त्यांनी प्रशासकीय यंत्रणेत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले ज्यामुळे आपल्या नागरिकांना सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल  आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवेल. ते म्हणाले की पर्यावरण आणि निसर्गाकडे मालक म्हणून न पाहता विश्वस्त म्हणून पाहण्यामुळे आपल्याला एक समग्र आणि निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरणा मिळेल ज्याचा मापदंड दरडोई कार्बन फूटप्रिंट असू शकतो.

8 कोविड नंतरच्या जगात कुठूनही काम कराही एक नवीन साधारण गोष्ट आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी पाठपुरावा आणि दस्तावेजीकरण म्हणून जी-20 आभासी सचिवालयाची स्थापना करण्याची सूचना केली.

9. 15 व्या जी -20 नेत्यांची शिखर परिषद 22 नोव्हेंबर 2020 रोजी देखील सुरू राहणार असून समाप्तीच्या वेळी नेत्यांच्या  घोषणापत्राला मान्यता दिली जाईल  आणि सौदी अरेबिया इटलीकडे अध्यक्षपद सोपवेल.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674853) Visitor Counter : 230