जलशक्ती मंत्रालय
स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत उद्या ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा करण्यात येणार
जलशक्ती मंत्र्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट जिल्हे/राज्यांना स्वच्छता पुरस्कार प्रदान केले जाणार
Posted On:
18 NOV 2020 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2020
जलशक्ती मंत्रालयाच्या पिण्याचे पाणी आणि स्वच्छता विभागाकडून उद्या, 19 नोव्हेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण अंतर्गत ‘जागतिक शौचालय दिन’ साजरा करण्यात येणार आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी आणि स्वच्छता क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी जिल्हा/ राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि राज्यमंत्री रतन लाल कटारीया दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट जिल्हे/राज्यांना ‘स्वच्छता पुरस्काराने’ सन्मानित करणार आहेत.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीणचा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यातील (2014-19) सफलता जारी ठेवण्यासाठी वेळेअगोदर सुरु करण्यात आला आहे. देशभर स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय उभारणे आणि सामुदायिक शौचालय अभियान (एसएसए) यासारखे सामुदायिक स्वच्छता संकुल (सीएससी) सौंदर्यीकरण उप्रकम गेल्या सहा वर्षांत हाती घेतले आहेत.
* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1673834)
Visitor Counter : 168