पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सुप्रसिद्ध बंगाली अभिनेता सौमित्र चॅटर्जी यांच्या निधनाबद्दल केला शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
15 NOV 2020 4:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2020
सुप्रसिद्ध बंगाली अभिनेता सौमित्र चॅटर्जी यांच्या निधनाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्वीट संदेशाद्वारे पंतप्रधान म्हणाले, "सौमित्र चॅटर्जी यांच्या निधनामुळे जागतिक सिनेमाची, पश्चिम बंगाल आणि भारताच्या सांस्कृतिक जीवनाची प्रचंड हानी झाली आहे. त्यांच्या अभिनयातून त्यांनी बंगाली संवेदनशीलता, भावना आणि नीतिमत्ता यांना मूर्त स्वरूप दिले. त्यांच्या निधनामुळे मला क्लेश झाले आहेत. मी त्यांच्या कुटुंबियांचे आणि प्रशंसकांचे सांत्वन करीत आहे. ओम शांती.”
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1673027)
आगंतुक पटल : 165
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam