आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या 37 व्या दिवशीही जास्त


पॉझीटीव्हिटी दर आणि दैनंदिन मृत्यू संख्येत घट जारी

Posted On: 09 NOV 2020 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 नोव्‍हेंबर 2020


गेल्या 24 तासात 50,000 पेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात 45,903 कोविड-19 रुग्णांची नोंद झाली. कोविड संदर्भातल्या सूचनांचे योग्य पालन करण्याबाबतचे जन आंदोलन यशस्वी ठरत असल्याने दैनंदिन नव्या रुग्णसंख्येचा आलेख घटता राहिला आहे. 

नव्या रुग्णांपेक्षा, बरे झालेल्यांची संख्या जास्त राहण्याचा कल 37 व्या दिवशीही सुरु राहिला. गेल्या 24 तासात 48,405 रुग्ण बरे झाले.

हा कल कायम राहिल्याने सक्रीय रुग्णांची संख्या भारतात कमी होत असून सध्या ही संख्या 5.09 लाख आहे. देशात  सक्रीय रुग्णांची संख्या 5,09,673 आहे.        

नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असल्याने बरे होण्याचा दर आता 92.56% आहे. बरे झालेल्यांची एकूण संख्या 79,17,373 आहे. बरे झालेले आणि सक्रीय रुग्ण यांच्यातले अंतर वाढून 74,07,700 झाले आहे. 

नव्या रुग्ण संख्येत घट होत असल्याने भारताचा पॉझीटीव्हिटी दरही घटत आहे मात्र चाचण्या करण्यासाठीचे केंद्र आणि राज्य सरकारचे प्राधान्य कायम आहे. भारताचा पॉझीटीव्हिटी दर कमी होऊन आज हा दर  7.19%  आहे.  

बरे झालेल्या रुग्णांपैकी 79% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत. 

बरे झालेल्यांची एका दिवसातली सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात नोंदवली गेली असून इथे एका दिवसात  8,232 रुग्ण बरे झाले. केरळमध्ये ही संख्या 6,853 तर दिल्लीमध्ये ही संख्या 6,069 होती. 

नव्या रुग्णांपैकी 79% रुग्ण 10 राज्य/केंद्र शासित प्रदेशात आहेत. दिल्लीमध्ये सर्वात जास्त म्हणजे 7,745 नवे रुग्ण आढळले. त्यानंतर महाराष्ट्रात  5,585 आणि केरळ मध्ये 5,440 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात 490 मृत्यूंची नोंद झाली. मृत्युच्या संख्येत घट होत असून गेल्या 24 तासात 500 पेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली.

490 मृत्यूंपैकी सुमारे 81% मृत्यू 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत. गेल्या 24 तासात नोंद झालेल्या मृत्यूंपैकी  25.51% म्हणजे  125 मृत्यू महाराष्ट्रातले आहेत. दिल्लीमध्ये 77 आणि पश्चिम बंगाल मध्ये 59 मृत्यूंची नोंद झाली.

* * *

S.Tupe/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1671435) Visitor Counter : 193