कायदा आणि न्याय मंत्रालय
न्यायमूर्ती संजय कुमार मेधी, नानी तागिया आणि मनीष चौधरी यांची गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश पदी नियुक्ती
प्रविष्टि तिथि:
06 NOV 2020 5:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2020
भारतीय राज्यघटनेच्या कलम 217 (1) मधील अधिकारांचा उपयोग करत राष्ट्रपतींनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश न्यायमूर्ती संजय कुमार मेधी, न्यायमूर्ती नानी तागिया आणि न्यायमूर्ती मनीष चौधरी यांना गुवाहाटी उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ही नियुक्ती लागू होईल. यासंदर्भात कायदा व न्याय मंत्रालयाने अधिसूचना क्रमांक के-13018/02/2020-यूएस.11 आणि अधिसूचना क्रमांक के.13018/03/2020-यूएस.II जारी केले आहेत
* * *
M.Chopade/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1670696)
आगंतुक पटल : 170