इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

समाजातील तळागाळातील समस्या सोडवण्यासाठी भारतातील 1300 प्रतिभावंत गव्ह टेक-थॉन 2020 मध्ये सहभागी


नॅशनल इनफॉरमेटिक्स सेंटर, आयईईई आणि ओरॅकल देशव्यापी व्हर्च्युअल हॅकेथॉनसाठी एकत्र आले

Posted On: 06 NOV 2020 3:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्‍हेंबर 2020


केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या, आयईईई, नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) आणि ओरॅकल आयोजित जीओव्ही टेक-थॉन 2020 या 36 तासांच्या पॅन-इंडिया व्हर्च्युअल हॅकाथॉन-गव्ह-टेक-थॉन 2020 ची यशस्वी सांगता 1 नोव्हेंबर 2020 रोजी झाली. व्हर्च्युअल हॅकेथॉनला 390 संघ तयार करणार्‍या 1300 हून अधिक इच्छुकांकडून नोंदणी झाली. हॅकॅथॉन वेबपेजवर 2 आठवड्यांत 15,000 पेक्षा जास्त अभ्यागतांची नोंद दिसून आली.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांनी दिलेल्या 5 समस्या निवेदनांवर 100 संघांमधुन  निवडलेल्या 447 उत्साही लोकांनी हॅकथॉनमध्ये भाग घेतला.

उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकारी क्षेत्रातील 27 जणांच्या निवड समितीने प्रस्तावांचे सखोल मूल्यांकन केले.

जीओव्ही टेक-थॉन 2020 कडून अभिनव उपायांसाठी पुढील पाच आव्हाने होती 

  1. उत्पादकता वाढविण्यासाठी भूप्रदेश आणि स्थानिक आव्हानांचा विचार करत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या हंगामात शेतकर्‍यांना पर्यायी पिके सुचवणे
  2. बियाणे पुरवठा साखळी ही एक जटिल व्यवस्था आहे ज्यामध्ये विविध भागधारकांचा समावेश आहे. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून खराब बियाण्यांचा शोध घेऊन बियाण्याच्या गुणवत्तेच्या प्रश्नांकडे प्रभावीपणे लक्ष देणे
  3. एकाच वेळी कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी, आकार बदलण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी मोबाइल / वेब आधारित व्यवस्था
  4. रिमोट-सुपरिव्हिजन सॉफ्टवेअर आणि वेब कॅमच्या संयोजनाद्वारे घरे / संस्थांकडून ऑनलाइन परीक्षांचे परीक्षण करण्याची व्यवस्था. एआय / एमएल इत्यादी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून सिस्टीमने आवश्यक प्रमाणीकरण, नियंत्रण, फसवणूक ओळखणे आणि पालन करणे सुनिश्चित केले पाहिजे.
  5. वाहन फिटनेस चाचणी प्रक्रियेचे ऑटोमेशन पारदर्शी करण्यासाठी स्वयं-शिक्षणाचे साधन सुचवणे

प्रथम स्थान रॉबर्ट बॉश अभियांत्रिकी आणि व्यवसाय समाधान प्रा.लि. च्या फिट फॉर फ्यूचर टीमला देण्यात आले. स्वयंचलित वाहन तंदुरुस्ती चाचणीसाठी त्यांनी अभिनव उपाय दाखविला. दुसरे स्थान वडोदरा येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे हॅकडेमन्स होते. त्यांनी दूरस्थपणे घेतल्या जाणार्‍या परीक्षांच्या प्रभावी देखरेखीसाठी सुरक्षित तोडगा दिला. तिसरे स्थान पीईएस युनिव्हर्सिटी, बंगळुरूच्या ऑरेंज टीमला देण्यात आले, ज्यांनी ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीचा वापर करून बियाणे प्रमाणीकरणासाठी एक आगळावेगळा उपाय सुचवला.

1 नोव्हेंबर, 2020 रोजी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात कृषी मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आणि परिवहन मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच एनआयसी, ओरॅकल आणि आयईईईचे वरिष्ठ अधिकारी आणि आयईईईच्या संगणक सोसायटी बोर्डचे सदस्य प्रोफेसर रामलता मारिमुथू आणि ज्यूरीचे अनुभवी सल्लागार यांचा समावेश होता. 

 

* * *

M.Chopade/S.Tupe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670636) Visitor Counter : 170