उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींच्या हस्ते, “आंतरराष्ट्रीय सत्वधानम्” या विशेष साहित्यिक उपक्रमाचे उद्‌घाटन


भाषा ही आपली संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग, ती आपली संपत्ती असून तिचे रक्षण ही आपलीच जबाबदारी : उपराष्ट्रपती

भाषा संवर्धन आणि अस्तंगत झालेल्या परंपरांना पुनरुज्जीवित करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचे कौतुक

Posted On: 05 NOV 2020 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2020

अवधानम हा साहित्य उपक्रम तेलुगु भाषेच्या समृद्ध परंपरेला पुढे नेण्यात महत्वाचे योगदान देणारा ठरला आहे, असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. हा उपक्रम सध्या काही निवडक भाषांमध्येच असून त्याची व्याप्ती वाढवली जावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उपराष्ट्रपतींच्या हस्ते आज ‘आंतरराष्ट्रीय सत्वधानम्’ या उपक्रमाचे आभासी उद्‌घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. तिरुपती येथे कृष्णदेवराय सत्संगाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. अवधानं या कार्यक्रमातून साहित्यिक संपदा पुढे नेण्यात मदत होते, असे ते म्हणाले.

आपली मातृभाषा ही आपली संपत्ती आहे. ही परंपरा आणि संस्कृती जपण्यासाठी तसेच पुढच्या पिढ्यांपर्यंत हा वारसा पोहचवण्यासाठी लेखक, कवी, भाषातज्ञ आणि इतरांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन त्यांनी केले. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. परदेशी भाषा शिकतांना आपल्या मातृभाषेचा विसर पडू देऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1670411) Visitor Counter : 265