मंत्रिमंडळ
औषध उत्पादने नियमन क्षेत्रातील सहकार्याबद्दल भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यामधील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी
Posted On:
04 NOV 2020 6:29PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाने औषध उत्पादन नियमन क्षेत्रातील सहकार्याबद्दल भारतातील केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्था (CDSCO) आणि युनायटेड किंगडम मेडिसिन्स आणि हेल्थकेअर प्रॉडक्टस रेग्युलेटरी एजन्सी (UK MHRA) यांच्यामधील सामंजस्य कराराला मंजूरी दिली आहे.
सुफळ सहकार्य आणि केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संस्था (CDSCO) व युनायटेड किंगडमची युनायटेड किंगडम मेडिसिन्स आणि हेल्थकेअर प्रॉडक्टस रेग्युलेटरी एजन्सी (UK MHRA) यांच्या आपापल्या आंतरराष्ट्रीय दर्जानुसारच्या औषध निर्मिती क्षेत्रातील बाबींची आखणी करण्यास या सामंजस्य कराराची मदत होईल.
1. सुरक्षा संबधित माहितीचे आदानप्रदान, ज्या दुसऱ्या पक्षाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण औषधनिर्माण दक्षता माहितीचाही अंतर्भाव. औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणे यांच्याशी संबधित सुरक्षा यांच्या माहितीचे आदानप्रदान
2. भारत तसेच युकेकडून आयोजित केलेल्या विज्ञान आणि प्रायोगिक परिषदा, सिम्पोजिया, चर्चासत्रे यांच्यात सहभाग
3. उत्तम प्रयोगशाळा (GLP), उत्तम क्लिनिकल सेवा (GCP), उत्तम उत्पादन सेवा, उत्तम वितरण सेवा (GDP), आणि उत्तम औषधीसंबधी दक्षता सेवा (GPvP) यासंबधीत माहितीचे आदानप्रदान व सहकार्य
4. परस्पर सहमतीच्या क्षेत्रांत क्षमता निर्माण
5. परस्परांच्या नियामक चौकटी समजून घेउन त्यांची गरज आणि प्रक्रियांना चालनास. दोन्ही पक्षांच्या भविष्यकालीन नियमनाला सहकार्य आणि त्यासाठी दोन्हींचाही पुढाकार.
6. औषधी व वैदयकीय उपकरणे या संबंधीत कायदे व नियमन यांच्या माहितीचे आदानप्रदान
7. विनापरवाना आयात-निर्यातीच्या प्रतिबंधासाठी सहाय्याच्या हेतूने माहितीचे आदान प्रदान
8. आंतरराष्ट्रीय मंचांवर सहकार्य
या कराराने दोन्ही बाजूंचे नियमन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल आणि औषधी उत्पादनांचे नियमन आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सहकार्य वाढण्यासाठी मदत होईल.
M.Chopade/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670124)
Visitor Counter : 226
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam