सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

कारगिल-लेहमध्ये खादीने रोजगाराच्या माध्यमातून आनंद फुलवला

Posted On: 02 NOV 2020 5:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2020

 

खादी आणि ग्रामोद्योग विभागाने (KVIC)  सुरू केलेल्या स्वयंरोजगार कार्यक्रमांमुळे कारगिल व लेह मधील हिमालयीन पर्वतरांगांचा शांत आणि अस्पर्शित  भाग आता उत्पादक उपक्रमांनी गजबजला आहे.

खादी आणि ग्रामोद्योग विभागाने 2017-18 मध्ये पंतप्रधान रोजगार निर्माण कार्यक्रम (PMEGP) या योजने अंतर्गत 1000 छोटे व मध्यम उत्पादन युनिट  कारगिल व लेह या प्रदेशांमध्ये सुरू केली. यामुळे तीन- साडेतीन वर्षातच 8200 स्थानिक युवकांना रोजगार मिळाला, याशिवाय या उद्योगांना आधार म्हणून  2017-18 पासून गुंतविलेल्या 32.35 कोटी रुपयांशिवाय अधिक निधी उपलब्ध झाला.

सिमेंट ब्लॉक्स, लोखंडी व स्टीलच्या वस्तू, ऑटोमोबाईल दुरुस्ती वर्कशॉप्स, लाकडावरी कोरीवकाम, सायबर कॅफे, ब्युटी पार्लर्स आणि सोन्याचे दागिने घडवणारी दुकाने अशा अनेक उद्योगांना सहाय्य करत खादी आणि ग्रामोद्योग विभागाने स्थानिकांना उत्तम व स्पृहणीय रोजगाराकडे वळवले आहे. कोविड-19 च्या छायेतील 2020-21 च्या पहिल्या सहा महिन्यातही खादी आणि ग्रामोद्योग विभागाने विविध क्षेत्रातील 26 नवे उपक्रम कारगिलमध्ये  आणि 24 नवे उपक्रम  लेहमध्ये सुरू करण्यास सहकार्य केले. यामुळे या दोन्ही विभागात मिळून 350 रोजगारांची निर्मिती झाली.

विशेष दखलपात्र बाब म्हणजे, खादी आणि ग्रामोद्योग विभाग हा पंतप्रधान रोजगार निर्माण कार्यक्रम (PMEGP) राबवणारी केंद्रीय संस्था आहे.  2017-18 ते 2020-21 पर्यंत (सप्टेंबर 30 पर्यंत) खादी आणि ग्रामोद्योग विभागाने कारगिलमध्ये 6781 तर लेहमध्ये 1421 रोजगार निर्माण केले. या कालावधीत KVIC ने या उपक्रमांसाठी  कारगिलमध्ये 26.67 कोटी रुपये तर लेहमध्ये 5.68 कोटी रुपये गुंतवले.

मोहमद बाकिर, हा कारगिलमधील मिन्जी गावाचा रहिवासी. त्याने सुरुवातीच्या 10 लाख रुपयांच्या कर्जासहित सिमेंटच्य़ा विटांच्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला. यामधून आता वार्षिक 52 लाखांच्या उलाढाल तो  करतो आहे. त्याच्या उत्पादन युनिटमध्ये 8 जणांना रोजगार मिळाला आहे.

कारगिल आणि लेहमध्ये 2017-18 ते 2020-21मधील उपक्रम आणि रोजगारांची संख्या (सप्टेंबर 30 पर्यंत)

Sr No

Year

No of Projects

Margin Money

disbursed

(in Rs Lakh )

Employment created

01

2017-18

172

417.12

1099

02

2018-19

462

1491.63

4252

03

2019-20

309

1122.94

2501

04

2020-20

(upto 30.09.2020)

50

204.00

350

05

Total

993

3235.69

8202

M.Iyengar/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1669518) Visitor Counter : 240