अर्थ मंत्रालय

ऑक्टोबर  2020 मध्ये 1,05,155 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित

Posted On: 01 NOV 2020 3:56AM by PIB Mumbai

 

ऑक्टोबर  2020 मध्ये  1,05,155 कोटी रुपये सकल  जीएसटी (वस्‍तु आणि सेवा कर) महसूल संकलन झाले ज्यात सीजीएसटी 19,193 कोटी रुपये, एसजीएसटी 25,411 कोटी  रुपये, आयजीएसटी 52,540 कोटी रुपये  (मालाच्या आयातीवर संकलित  23,375 कोटी रुपयांसह ) आणि उपकर (सेस) 8,011 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित  932 कोटी रुपयांसह ) समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी 31 ऑक्टोबर , 2020 पर्यंत दाखल करण्यात आलेल्या  जीएसटीआर-3बी विवरणपत्रांची एकूण  संख्‍या 80 लाख आहे.

सरकारने नियमित निपटारा स्वरूपात  आयजीएसटीमधून  सीजीएसटीसाठी  25,091 कोटी  रुपये आणि एसजीएसटीसाठी 19,427 कोटी  रुपये दिले आहेत. ऑक्टोबर  2020 मध्ये नियमित निपटारा केल्यानंतर  केन्‍द्र सरकार आणि राज्‍य सरकारे यांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 44,285 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी  44,839 कोटी  रुपये आहे..

या महिन्यात मिळालेला जीएसटी महसूल गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत  10 टक्के  अधिक आहे. या महिन्यात मालाच्या आयातीतून मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के  अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारांमधून  (सेवांच्या आयातीसह ) प्राप्त महसूल  11 टक्के  अधिक होता. जीएसटी महसुलातील वाढ जुलै , ऑगस्ट आणि सप्टेंबर  2020 च्या तुलनेत अनुक्रमे  (-)14, -8 आणि  5 टक्के  वाढ नोंदली गेली जी अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि महसुलातील वाढ दर्शवते.

खाली दिलेला तक्ता चालू वित्त वर्षादरम्यान  मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवतो. त्यामध्ये ऑक्टोबर  2019 च्या तुलनेत ऑक्टोबर  2020 दरम्यान आणि संपूर्ण वर्षात प्रत्येक राज्यातील जीएसटी संकलन राज्यनिहाय दिले आहे-

Table: State-wise GST collection for April 2020

 

State

Oct-19

Oct-20

Growth

Jammu and Kashmir

313

377

21%

Himachal Pradesh

669

691

3%

Punjab

1,189

1,376

16%

Chandigarh

157

152

-3%

Uttarakhand

1,153

1,272

10%

Haryana

4,578

5,433

19%

Delhi

3,484

3,211

-8%

Rajasthan

2,425

2,966

22%

Uttar Pradesh

5,103

5,471

7%

Bihar

940

1,010

7%

Sikkim

186

177

-5%

Arunachal Pradesh

41

98

138%

Nagaland

25

30

20%

Manipur

43

43

0%

Mizoram

18

32

72%

Tripura

54

57

5%

Meghalaya

113

117

4%

Assam

888

1,017

14%

West Bengal

3,263

3,738

15%

Jharkhand

1,437

1,771

23%

Odisha

1,994

2,419

21%

Chattisgarh

1,570

1,974

26%

Madhya Pradesh

2,053

2,403

17%

Gujarat

5,888

6,787

15%

Daman and Diu

83

7

-91%

Dadra and Nagar Haveli

130

283

118%

Maharastra

15,109

15,799

5%

Karnataka

6,675

6,998

5%

Goa

311

310

0%

Lakshadweep

2

1

-55%

Kerala

1,549

1,665

7%

Tamil Nadu

6,109

6,901

13%

Puducherry

146

161

10%

Andaman and Nicobar Islands

32

19

-42%

Telangana

3,230

3,383

5%

Andhra Pradesh

1,975

2,480

26%

Ladakh

0

15

 

Other Territory

127

91

-28%

Center Jurisdiction

97

114

17%

Grand Total

73,159

80,848

11%

 

****

M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1669324) Visitor Counter : 237