आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताने पार केला मैलाचा दगड


85 दिवसांनंतर प्रथमच सक्रीय रुग्णसंख्या 6 लाखांपेक्षा कमी

एकूण बाधित रुग्णसंख्येपैकी सक्रिय रुग्णसंख्या केवळ 7.35 %

Posted On: 30 OCT 2020 2:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2020

कोविड विरुद्धच्या लढ्यामध्ये भारताने प्रथमच एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे. गेल्या जवळपास तीन महिन्यांमध्ये (85 दिवस) प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या सहा लाखांपेक्षा कमी झाली आहे. भारतात आज 5.94 लाख सक्रिय रुग्णांची नोंद आहे. 6 ऑगस्ट रोजी 5.95 लाख सक्रिय रुग्ण संख्या होती.

देशातील एकूण बाधितांची संख्या 5,94,386 इतकी असताना सक्रिय रुग्णांची संख्या सध्या केवळ 7.35 %  इतकीच आहे. त्यामुळे या आकड्यामध्ये सतत घसरण होण्याची प्रक्रिया आणखी मजबूत झाली आहे.

विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील सक्रिय रुग्ण संख्येचा वेग प्रत्येक ठिकाणी त्यांच्या प्रयत्नानुसार वैविध्यपूर्ण आहे आणि जागतिक महामारीच्या विरुद्ध असलेल्या लढ्यामध्ये हळूहळू प्रगती दर्शवित आहेत.

भारतात रुग्ण बरे होण्याचा दर देखील कायम राखण्यात आला आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या  73,73,375 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येमध्ये जागतिक पातळीवर भारत हा नेहमीच अव्वल क्रमांकांमध्ये राहिला आहे. सक्रिय रुग्णसंख्या आणि बरे झालेल्या रुग्णांची संख्या यामधील फरक हा सातत्याने वाढत राहिला आहे आणि तो आता आज 6,778,989 इतका आहे.  

57,386 रुग्ण बरे झाले आहेत आणि गेल्या 24 तासात त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर नव्याने नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 48,648 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 91.15 % इतका आहे.

बरे झालेले 80 % रुग्ण हे 10 राज्य / केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

केरळमध्ये एका दिवशी सर्वाधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या 8,000 इतकी नोंदविण्यात आली आहे तर त्यानंतर. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे प्रत्येकी 7,000 पेक्षा अधिक बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे.

गेल्या 24 तासात 48,648 इतकी नव्याने नोंद झालेली रुग्णसंख्या आहे.

यापैकी 78 % रुग्ण हे 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. केरळमध्ये अजूनही नव्याने नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे, 7,000 पेक्षा अधिक ही नव्याने नोंद झालेली रुग्णसंख्या आहे, तर त्याबरोबर महाराष्ट्र आणि दिल्ली येथे प्रत्येकी 5,000 पेक्षा अधिक रुग्णसंख्या आहे.

गेल्या 24 तासात 563 मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 81 % संख्या ही 10 राज्य / केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्रित आहे.

महाराष्ट्रामध्ये एका दिवसात सर्वाधित मृत्यूंची (156 मृत्यू) नोंद आहे त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 61 मृत्यूंची नोंद आहे.

डब्ल्यूएचओ च्या सल्ल्यानुसार भारताने 140 चाचण्या / दिवस / दशलक्ष लोकसंख्या यासंदर्भात लक्षणीय कामगिरी बजावली आहे. कोविड-19 च्या संदर्भात सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाय समायोजित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यास निकष या संबंधीच्या मार्गदर्शक सूचीमध्ये डब्ल्यूएचओ ने संशयित रुग्णांच्या व्यापक देखरेखीसाठी या रणनीतीचा सल्ला दिला आहे.

यशस्वितेच्या पुढच्या टप्प्यात 35 राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी निर्धारित चाचणी संख्या देखील ओलांडली आहे. प्रतिदिनी रोज प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे 844 चाचण्या होत आहेत. दिल्ली आणि केरळसाठी हा आकडा 3,000 आहे.

 

U.Ujgare/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668816) Visitor Counter : 187