विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सीएसआयआर-सीडीआरआयचे शास्त्रज्ञ डॉ सतीश मिश्रा यांना नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसचा डॉ तुलसीदास चुघ पुरस्कार-2020 जाहीर


मलेरिया परजीवीच्या जीवन चक्रावरील त्यांच्या संशोधनाच्या कार्याचा गौरव

Posted On: 28 OCT 2020 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2020


नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस (भारत), यांच्याकडून दिला जाणाारा   “डॉ तुलसी दास चुघ पुरस्कार”   2020 साठी सीएसआयआर-सीडीआरआय लखनऊ येथील प्रमुख वैज्ञाानिक डॉ सतीश मिश्रा यांना मलेरिआ परजीवीच्या जीवन चक्रावरील संशोधन कार्यासाठी प्रदान करण्यात आला आहे. सस्तन प्राणी आणि डास दोघांसाठीही घटनांचा समन्वित क्रम आवश्यक असतो. त्यांचे अतुलनीय कार्य “सेक्रेटेड प्रोटीन विद अल्टर्ड थ्रोम्बोस्पोंडिन रीपीट (SPATR) जो असलैंगिक रक्त अवस्थेसाठी आवश्यक आहे परंतु मलेरिया परजीवी प्लाझमोडियम बर्गीकडून हेप्याटोसाइट आक्रमणासाठी आवश्यक नाही” यावर केंद्रीत आहे.  

हा अभ्यास पी. बर्ग स्पोरोजोइट्स मधील एसपीएटीआरच्या (SPATR) वितरण आणि रक्त अवस्था संक्रमणाचे महत्त्व यावर केंद्रित आहे, या प्रक्रियेदरम्यान त्याची नेमकी भूमिका उलगडण्यासाठी पुढील तपासणी आवश्यक आहे.

डॉ तुलसी दास चुघ पारितोषकाचे स्वरुप मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम असे आहे. अकादमीच्या वार्षिक परिषदेत पुरस्कार प्रदान करण्यात येईल. वार्षिक परिषदेदरम्यान, एका सत्राचे आयोजन करण्यात येईल ज्यात त्यांच्या कार्याचे सादरीकरण आणि त्यानंतर चर्चासत्र होईल. 

डॉ सतीश मिश्रा यांना मिळालेले पुरस्कार :

  • 2019 मध्ये नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस, इंडियाचे सभासद
  • 2018 मध्ये नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस, इंडियाचे सभासद
  • भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, भारत सरकारचे शकंतुला अमीर चंद पारितोषिक 2018
  • 2013 मध्ये केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाची रामालिंगास्वामी फेर-प्रवेश शिष्यवृत्ती.

 

* * *

B.Gokhale/S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668192) Visitor Counter : 247